Advertisement

‘या’ विद्यार्थ्यांची मेडीकल, इंजिनिअरींगची फी मुंबई पालिका भरणार

मुंबई महानगरपालिकेनं दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

‘या’ विद्यार्थ्यांची मेडीकल, इंजिनिअरींगची फी मुंबई पालिका भरणार
SHARES

मुंबई महानगरपालिकेनं (BMC News) दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. दहावी गुणवंत झालेले जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होऊन मेडिकल आणि इंजिनिअरींगसारख्या (Medical & Engineering Study) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतील, त्यांचा शैक्षणिक खर्च पालिका उचलणार आहे.

पालिका शाळांमधील दहावीच्या परीक्षेत पहिल्या 25 मध्ये येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. पालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेडिकल आणि इंडिनिअरींग शिक्षणाच्या फीचा खर्च पालिका भरणार आहेत.

पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात. त्याशिवय मोफत बेस्ट प्रवास, डिजिटल क्लासरुप, टॅब यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदतही होते.

मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबातील आणि गरिब घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी आणि त्यांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी पालिकेकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात.

याच पार्श्वभूमीवर आता दहावी परीक्षेत पहिल्या 25 मध्ये येणाऱ्या पालिका शाळांमधील मुलांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील आणि मुंबईच्या पालिका शाळेत शिकणारी मुलंही इंजिनिअर आणि मेडिकल प्रवेशाचं स्वप्न साकार करु शकणार आहेत.

या उपक्रमाअंतर्गत 2020 मध्ये दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आता बारावी उत्तीर्ण होतील. या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरींग सारख्या उत्त शिक्षणासाठी जाऊ इच्छितात, तसंच जे प्रवेश प्रक्रियेलाही पात्र ठरतील, अशांना पालिका मदत करणार आहेत. तसंच तांत्रिक (टेक्निकल), व्यावसायिक पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक फी दिली जाणार आहेत.



हेही वाचा

बारावीचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार, शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

पालिका शाळा विद्यार्थ्यांना नवा गणवेश, निळ्याऐवजी ‘या’ रंगाचा पोषाख

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा