Advertisement

बारावीचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार, शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली.

बारावीचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार, शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती
SHARES

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसांपासून 12 वीचा निकालाबाबतच्या तारखांबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात होते. मात्र याबाबत शिक्षण मंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं होतं.

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात.

मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का असाही सवाल उपस्थित झाला होता.

या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील.
www.maharesult.nic.in

www.maharesult.nic.in

https://msbshse.co.in/

https://hscresult.mkcl.org/

https://mahresult.nic.in/



हेही वाचा

पालिका शाळा विद्यार्थ्यांना नवा गणवेश, निळ्याऐवजी ‘या’ रंगाचा पोषाख

स्कूल बसमध्ये GPRS बसवणं अनिवार्य, अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा