Advertisement

मुंबई विद्यापीठात भरला योगाचा तास


मुंबई विद्यापीठात भरला योगाचा तास
SHARES

गुरुवारी, २१ जूनला जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा उत्साह दिसून आला. या योगदिवसानिमित्त मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बेकेसी यांसारख्या विविध ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आला. याच आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून मुंबई विद्यापीठात योग दिनानिमित्त योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

IMG-20180621-WA0063.jpg

यांनीही लावली हजेरी

नुकतच आयोजित केलेल्या योग दिवसाच्या कार्यक्रमात विविध योग करण्यात आले. यात विद्यापीठतील विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्यासह कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यानीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

IMG-20180621-WA0064.jpg

महाविद्यालयांमध्ये योग शिबीर

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून १५ जून ते २१ जून २०१८ दरम्यान प्रत्येक महाविद्यालयांमध्ये तीन दिवस योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून विद्यापीठामार्फत ३०० विद्यार्थ्यांचे योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन वांद्रे येथील आरडी नॅशनल महाविद्यालयात कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.


हेही वाचा -

ऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स !

आंतरराष्ट्रीय योग दिन : मुख्यमंत्र्यांसह उपराष्ट्रपतींनी केला योगा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा