Advertisement

ऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स !


ऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स !
SHARES

आजकल 'फिटनेस' हा परवलीचा शब्द बनला आहे. मात्र व्यस्त जीवनशैलीतून व्यायामासाठी वेळ काढणं अनेकांना शक्य होत नाही. महिलांना तर नोकरी, व्यवसाय करताना घराची जबाबदारीही पेलावी लागते. त्यामुळं त्यांना व्यायामासाठी वेळ काढणं तसं अवघडच जातं. ऑफिसमध्ये ८-९ तास एकाच जागी बसून काम केल्यानं मान दुखणं, पाठ भरून येणं, डोकं जड होणं, हात-पाय आखडल्यासारखं वाटणं असा त्रास अनेकांना जाणवतो. हा त्रास बळावत जाऊन त्याचं पुढे मोठ्या व्याधीत रुपांतर होऊ शकतं. 


या त्रासावर मात करून फिट राहायचं असेल, तर जीममध्ये जाऊन घाम गाळायचीही गरज नाहीय. ऑफिसमध्ये बसल्या जागी देखील तुम्ही व्यायाम करू शकता. स्ट्रेंचिंग, वॉकिंग असे व्यायाम करून तुम्ही फिट राहू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त १५ ते २० मिनिटं द्यावे लागतील. ऑफिसमध्ये करता येतील, अशा काही व्यायाम प्रकारांची 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला ओळख करून देत आहे.  


1) आर्म स्ट्रेच

कसे कराल?

दोन्ही हात सरळ रेषेत ठेवा. त्यानंतर दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये अक हात वरच्या दिशेला ताठ ठेवा. काही वेळाने हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. हे आसन तुम्ही खूर्चीत बसून देखील करू शकता. 



फायदे

या आसनामुळं स्नायूची लवचिकता सुधारते. हातांवरील ताण कमी होतो.


2) लेग स्ट्रेच

कसे कराल?

खुर्चीवरून उठून उजवा पाय गुडघ्यात दुमडा आणि काही वेळ हातानं धरून ठेवा. याचप्रकारे डाव्या पायाचा देखील व्यायाम करा.

via GIPHY

">

via GIPHY

फायदे

रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते आणि स्नायू मोकळे होतात.


3) शोल्डर स्ट्रेच

कसे कराल?

हात खांद्यावर कोपरात दुमडून एका बाजूला स्ट्रेच करावा.



फायदे

डेस्कवर बसून टायपिंग करणं किंवा माऊसच्या वापरामुळं खांद्याचं दुखणं वाढू शकते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी खांद्याचं स्ट्रेचिंग करणं फायदेशीर ठरतं.


4) उत्तनासन

कसे कराल?

ताठ उभे राहा. हात सरळ रेषेत वर करा. त्यानंतर कंबरेत वाकून हात जमिनीला टेकवा. काही वेळानं हळूहळू पूर्वस्थितीत या.


फायदे

सतत बसून राहिल्याने पाठिचं दुखणं वाढतं. यापासून सुटका मिळवण्यासाठी उत्तनासन करणं फायदेशीर.


5) अॅब लिफ्ट

कसे कराल?

दोन्ही हात खुर्चीच्या सीटवर ठेवा. पाय गुडघ्यात वाकवून बसा. हळुहळू शरीराचा भार हातावर घेत शरीर खुर्चीपासून थोडं वर घ्या. या स्थितीत ५-६ सेकंद राहून मूळ स्थितीत या. कृपया रोलिंग खुर्ची वापरू नका.



फायदे

पोट, पाठ आणि खांद्यांचे स्नायू बळकट होतात. शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते. 


6) अॅब ट्विस्ट

कसं कराल?

खुर्चीच्या कडेला बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. कमरेतून शरीरावरील भाग एका बाजूला वळवा. हा प्रकार दोन्ही बाजूला ५ वेळा करा.


फायदे

कमरेजवळील चरबी कमी करण्यास उत्तम पर्याय आहे.


7) क्नी टू चेस्ट लिफ्ट

कसं कराल?

खुर्चीच्या मागच्या बाजूला न टेकता ताठ बसा. उजवा पाय हळुहळू वर घेऊन गुडघा छातीला लावा. त्याच स्थितीत ५-१० सेकंद राहा. हळुहळू पुन्हा पूर्वस्थितीत या.    

फायदे

ओटीपोटातील स्नायू मजबूत होतात आणि चरबी कमी होते. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.


8) डेस्क पुशअप्स

कसं कराल?

डेस्कपासून थोडं लांब उभं राहा. डेस्कवर दोन्ही हात टेकवून तुम्ही पुशअप्स मारू शकता. 

via GIPHY

">

via GIPHY

फायदे

हा उत्तम शारीरिक व्यायाम आहे. यामुळे तुमचं शरीर संतुलित राहतं. छाती, खांदे, ट्रायसेप्स आणि कोअर मसल्स मजबूत बनवण्यासाठी हा व्यायाम प्रकार हिट आहे. 



हेही वाचा

व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा