• व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
 • व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
 • व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
 • व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
 • व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
 • व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
 • व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
 • व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!
SHARE

गोळाफेकमध्ये राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावलेली जिनेडा कार्व्हालो. गोळाफेकपटू असल्यानं व्यायामाची तिला प्रचंड आवड. व्यायामावर असलेल्या प्रेमापोटी तिनं वसई परिसरातील एक जिम लावली होती. मंगळवारी जिमचा पहिला दिवस असल्यानं ती खूप उत्साही होती. पण हाच जिमचा पहिला दिवस जिनेडाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. जिममध्ये जिनेडा जोर बैठका मारत होती. जोर बैठका मारताना जिनेडा उभी राहिली आणि अचानक जागेवरच कोसळली. जिनेडाला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जिनेडाचा मृत्यू हार्ट अॅटॅकनं झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

"जिनेडाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे तिला नॉर्मल वर्कआऊट दिलं होतं. वॉर्मअप करताना अचानक ती जमिनीवर कोसळली. तिला तात्काळ आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं," असं एव्हरशाईन जिमतर्फे स्पष्ट करण्यात आलं.

गेल्या दहा दिवसांत जिम करताना मृत्यू ओढवल्याची ही दुसरी घटना आहे. अशीच एक घटना नाशिकमध्येही घडली होती. नाशिकमध्ये १९ वर्षीय मुलाचा जिममध्येच मृत्यू झाला होता. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अजिंक्य हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. व्यायाम शाळेत पुशअप्स करुन झाल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता हार्ट अॅटॅक आल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

व्यायाम करणं हे आरोग्यासाठी हितकारक आहे. पण व्यायाम करताना काही पद्धत आणि नियम असतात. त्याचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. पण व्यायाम करतानाची टेक्निक आणि नियम याकडे दुर्लक्ष करणं हे तुमच्या जीवावरही बेतू शकतं. व्यायामाची सवय चांगली हे आपले जुनेजाणते नेहमीच सांगतात. पण कित्येक जण याचं अनुकरण करतात? हा खरंच मोठा प्रश्न आहे. अनुकरण केलं तरी आपल्याला त्याचा फास्ट रिझल्ट हवा असतो. शिवाय चित्रपटांमध्ये हिरो किंवा हिरोईनसारखी फिगर आपल्याला पण हवी या वेडापायीही कित्येक जण जिम लावतात. मात्र तशा प्रकारची फिगर मिळवण्यासाठी आवश्यक असलेले पेशन्स आणि कष्ट करण्याची तयारी मात्र या वर्गाची नसते.  

अतिउत्साही म्हणा किंवा आततायीपणामुळे म्हणा,  हवी ती फिगर मिळवण्यासाठी व्यायामाचा अतिरेक होतो. व्यायामाचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम होणारच. हल्लीचा जमाना माहिती आणि तंत्रज्ञानाचा आहे म्हणतात. माहिती कशी एका क्लिकवर मिळते. तसाच काहीसा समज व्यायामासंदर्भात झाला आहे. दोन महिन्यात हवी तशी बॉडी कमावता येते या गैरसमजापोटी अनेकांचा जिमचा प्रवास सुरू होतो. पण या सगळ्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो.

व्यायामाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम


 • छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना होणे


 • हार्ट अॅटॅकची शक्यता बळावणे


 • चक्कर येणे


 • हात-पाय किंवा अंगं दुखू लागणे


 • पाय थरथर कापणे


 • रक्तदाब एकदम कमी होणेदिवसातून किती व्यायाम करायचा? कशाप्रकारे तुमचं डाएट असलं पाहिजे? यासंदर्भात फिटनेस ट्रेनर प्रकाश मोहिते  यांनी दिलेल्या या काही टिप्स


 • कोणतीही जिम लावताना स्वत:ची योग्य माहिती द्यावी. तुम्हाला जर मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणते आजार असतील तर त्यासंदर्भात जिम ट्रेनरला माहिती असणं आवश्यक आहे


 • तुमच्या लाईफस्टाईलबद्दल जिम ट्रेनरला माहित असणं आवश्यक आहे. तुम्ही काय काम करता? किती वेळ काम करता? यापासून ते तुमच्या खाण्या-पिण्याची माहिती जिम ट्रेनरला सांगावी. कारण त्यानुसार तुमच्याकडून व्यायाम करुन घेतला जातो


 • दिवसाला फक्त ४५ मिनिटांचा व्यायाम पुरेसा असतो. कमी वेळात फास्ट रिझल्ट हवा म्हणून व्यायामाचा अतिरेक करु नये


 • ट्रेडमिल, सायकलिंग किंवा जिमिंगला सुरुवात करण्यापूर्वी १൦ मिनिटांचं वॉर्मअप करणं गरजेचं आहे. स्ट्रेचिंग, जंम्पिंग, हँड मूव्हमेंट अशा प्रकारचे हलके व्यायाम प्रकार वॉर्मअपमध्ये असतात. वॉर्मअप केल्यानं तुमची बॉडी आणि मसल्स फ्री होतात


 • सुरुवातीला जमेल तेवढाच व्यायाम करा. ट्रेडमिल, सायकलिंग किंवा वेट ट्रेनिंग करताना जर दम लागला असेल, तर शरीरावर जबरदस्ती करु नका. व्यायाम तेव्हाच थांबवा.


 • आपला मित्र ३൦-४൦ पुशअप्स मारतोय, मग आपणही तेवढेच पुशअप्स मारु, ही वृत्ती घातक ठरू शकते.


 • एकाच दिवशी कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करू नये. एक दिवस कार्डिओ आणि दुसऱ्या दिवशी वेट ट्रेनिंग करावे. • ट्रेनरचं न ऐकता अति उत्साही व्यक्ती एकाच दिवशी कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करतात. पण अशा प्रकारे व्यायाम केल्यास तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही आजारी पडू शकता.


 • कार्डिओ ट्रेनिंग करताना ट्रेडमिल १൦ ते १५ मिनिटं त्याचप्रकारे सायकलिंग १൦ ते १५ मिनिटं करावी. १५ मिनिटांपेक्षा जास्त कार्डिओ करू नये.


 • कार्डिओ करताना त्याचा स्पीड जास्त वाढवू नका. प्रमाणापेक्षा जास्त स्पीड तुमच्या हृदयासाठी चांगला नाही. या बाबतीत जिम ट्रेनरचं ऐकणं तुमच्या हिताचं ठरेल.


 • वेट ट्रेनिंगमध्ये एक व्यायाम केला की शरीराला दोन ते तीन मिनिटांचा आराम पाहिजे.


 • डाएटच्या बातीत स्वत:च निर्णय घेऊ नका. यासंदर्भात जिम ट्रेनर किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.


 • जिमला जाण्यापूर्वी घरातून काही तरी हलकं फुलकं खाणं गरजेचं आहे. लवकर वजन कमी करायचं किंवा बारीक होण्याच्या नादात कित्येक जण काहीच न खाता जिममध्ये व्यायाम करतात. • काही न खाता जिममध्ये व्यायाम केल्यानं तुम्हाला चक्कर येऊ शकते. तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते. अॅसिडिटीमुळे तुमच्या छातीत दुखू शकतं.


 • दर तीन तासांनी तुम्ही हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. उपाशी राहून आजारांना निमंत्रण देऊ नका.


 • जिम करताना पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे. कारण घामावाटे तुमच्या शरीरातलं पाणी कमी होत असतं.


 • एक आठवडा जिममध्ये येऊन जोशात व्यायाम करणार, मग एक आठवडा दांडी, असं केल्यानंही तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. व्यायामामध्ये सातत्य असलं पाहिजे.


जिम ट्रेनर आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन तुम्ही व्यायाम केलात तर तो नक्कीच फायदेशीर ठरेल. उत्साहात व्यायामाचा अतिरेक करू नका. ते तुमच्याच शरीरासाठी घातक ठरू शकते.हेही वाचा

व्यायामाला वय नसतं !

आंबे खाण्यावरून डॉक्टरांमध्येच जुंपली !डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या