मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर 16 ते 28 ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टर्मिनल्स, ठाणे, कल्याण, पनवेल या स्टेशन्सवर ही बंदी असणार आहे.
पश्चिम रेल्वेने (Western Railway) येत्या सणासुदीच्या काळात गर्दी कमी करण्यासाठी आपल्या चार प्रमुख स्थानकांवर तात्पुरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली.
15 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील बांद्रा टर्मिनस आणि गुजरातमधील वापी, उधना आणि सूरत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरील निर्बंध लागू राहतील.
प्रसिद्धीपत्रकानुसार, काही विशिष्ट प्रकरणांमध्ये सूट दिली जाईल — ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना, महिला प्रवाशांना, दिव्यांग (विशेष क्षमतेच्या) व्यक्तींना, निरक्षर लोकांना किंवा विशेष मदतीची गरज असणाऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असेल.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या गर्दीच्या काळात मुंबईतील बांद्रा स्थानकावर ट्रेनमध्ये चढण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी जखमी झाले होते.
दरम्यान, डोंबिवली स्थानकात पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष ब्लॉक मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात 12 मीटर रुंद पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डर लॉचिंगसाठी अप आणि डाउन जलद मार्ग तसेच 5 वा आणि 6 वा मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक 15 आणि 16 ऑक्टोबरच्या रात्री 12.20 ते 3.20 वाजेपर्यंत 3 तास तर डाउन आणि अप जलद मार्गावर 1.20 ते 3.20 वाजेपर्यंत तास घेतला जाईल असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा