Advertisement

मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र

मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते
SHARES

दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचा दिवाळी धमाका पाहायला मिळणार आहे.

मनसेच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही दिवाळीच्या अगोदर दीपोत्सव सोहळा संपन्न होणार असून यंदाचा हा सोहळा खास असणार आहे. कारण, शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्धाटन यंदा चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत.

उद्धव ठाकरेंचं नाव मनसेच्या दीपोत्सव पुत्रिकेत छापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय याची देखील चर्चा होत आहे. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

शाळेतील तिसरी भाषा मराठा असावी, या मुद्द्यावरुन एकत्र येत ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाला असून गेल्या 2 महिन्यातील जवळीक सर्वांनाच आश्चर्य वाटणारी आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर उद्धव ठाकरेंची भेट असो किंवा, मातोश्री बंगल्यावर राज ठाकरेंचे स्वागत असो.

गेल्या काही दिवसांत ठाकरे बंधूंच्या जवळपास 7 ते 8 वेळा भेटी झाल्या आहेत. त्यात, दोनवेळा बंद दाराआड चर्चाही झाली असून आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे पुन्हा एकत्र येत आहे.

तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेही पुन्हा एकत्र येत आहेत. त्यामुळे, दिवाळीत शिवाजी पार्कवरुनच राजकीय धमाका होतो की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.



हेही वाचा

BMC Election साठी प्रभाग रचना जाहीर

निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल, आता...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा