Advertisement

महापालिका निवडणुका पुन्हा पुढे ढकलणार?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुक प्रक्रियेत होणाऱ्या घोळाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महापालिका निवडणुका पुन्हा पुढे ढकलणार?
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख विरोधपक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवडणूक पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी केली आहे. 

तसेच राज ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5-6 महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगा (एसईसी) सोबतच्या बैठकीत असे सुचवले की, प्राधिकरणाने मतदार यादीतील समस्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाला (एससी) माहिती द्यावी. तसेच निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी वेळ मागितला पाहिजे.

"पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे काय फरक पडणार होता? आता निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलल्या गेल्या तर काय फरक पडेल?" असे राज ठाकरे म्हणाले.

निवडणूक म्हटलं की, राजकीय पक्ष आणि मतदार महत्त्वाचे असतात, पण निवडणूक आयोग फक्त निवडणुका घेतात, राजकीय पक्ष त्या लढवतात. जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथेच आहे. 2024 पूर्वी आणि नंतरच्या दोन याद्या मी पाहिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जी यादी जाहीर झाली, त्यात फक्त नावं आहेत, फोटो नाहीत. निवडणूक आयोग एकमेकांवर सर्व जबाबदारी ढकलत आहे, असा आरोपी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. 

उद्धव ठाकरे यांनी मतदारयाद्यांमधील घोळावर थेट भाजपवर आरोप केला. त्यांनी म्हटलं की, लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भाजपलाही पत्र दिले, पण ते आले नाहीत.

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, निवडणूक घ्यायची असेल, तर ती पारदर्शक घ्या. निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की, तुम्हाला निष्पक्षपणे, पारदर्शकपणे निवडणुका घ्यायच्या असतील तरच घ्या अन्यथा तुम्ही इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा.

विधानसभा निवडणुकीवेळीच मतदार याद्यांमधीळ घोळ लक्षात आला होता. 19 ऑक्टोबरला याबाबत विधानसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. काही भाजपा कार्यकर्ते मतदारयादीशी खेळतायत. वाटेल त्यांना ते मतदार याद्यांमध्ये घुतसवत आहेत, वाटेल त्यांना वगळलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.



हेही वाचा

मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

bmc"="" target="_blank">BMC Election साठी प्रभाग रचना जाहीर">BMC Election साठी प्रभाग रचना जाहीर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा