Advertisement

पालघरमध्ये आदिवासी आरक्षणासाठी मोर्चा

अंदाजे 15 हजार आदिवासी या मोर्चात सहभागी झाले असून मोर्चाचे नेतृत्व आमदार विलास तरे आणि आमदार राजेंद्र गावित यांनी केले.

पालघरमध्ये आदिवासी आरक्षणासाठी मोर्चा
SHARES

पालघर (palghar) जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी समाजाचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. धनगर आणि बंजारा समाजांच्या अनुसूचित जमातींमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नांविरोधात हा मोर्चा (movement) काढण्यात आला.

हा मोर्चा बिरसा मुंडा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत पोहोचला. अंदाजे 15 हजार आदिवासी या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चाचे नेतृत्व आमदार विलास तरे आणि आमदार राजेंद्र गावित यांनी केले. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर सभेत रूपांतरित झाला. उपस्थित खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सरकारला इशारा दिला की आदिवासी आरक्षणावर (reservation) कुणाचाही डाका चालणार नाही.

पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, वाडा आणि वसई (vasai road) तालुक्यातील हजारो आदिवासी कार्यकर्ते, तरुण आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

आमदार राजेंद्र गावीत यांनी स्पष्ट केले की, बंजारा समाज स्वतःला ब्राह्मण समजतो, त्यामुळे त्यांना आदिवासी आरक्षणात स्थान देता येणार नाही. माजी खासदार बळीराम जाधव यांनी इशारा दिला की, पुढचा मोर्चा विधानसभेवर धडकणार आहे.

डॉ. पऱ्हाड म्हणाले, आदिवासी आरक्षण 1860 पासून अस्तित्वात आहे, हे फुकट मिळालेले नाही, त्यासाठी समाजाने रक्त सांडले आहे.

उपस्थितांनी ठरवले की, जर सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर पुढचा टप्पा मंत्रालयावर मोर्चाचा असेल. मोर्चात 30 हून अधिक आदिवासी संघटना सहभागी होत्या.

मोर्चाच्या बैठकीत आदिवासी (tribals) आरक्षणाची चौकट निश्चित करण्याची मागणी केली गेली. विशेष म्हणजे बंजारा समाज स्वतःला ब्राह्मण समजतो, त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीत स्थान देणे योग्य नसल्याचे आमदार राजेंद्र गावित यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार बळीराम जाधव यांनी इशारा दिला की जर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले, तर पुढील टप्प्यात मोर्चा विधानसभेकडे धडकणार आहे.



हेही वाचा

मुख्यमंत्री रोजगार योजनेमुळे 5 लाख तरूण बेरोजगार

मुंबईतील 9 पालिका अधिकाऱ्यांना कारवाईची नोटीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा