Advertisement

पुष्करचा वाढदिवस अन् सामाजिक बांधिलकी

पुष्कर श्रोत्रीनं नुकतंच वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यासोबतच त्याच्या कारकिर्दीला २५ वर्षेही पूर्ण झाली आहेत. हा सुवर्णयोग साधत पुष्करनं सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ‘पुष्कर शो THREE’ या विशेष उपक्रमाचं आयोजन केलं होतं.

पुष्करचा वाढदिवस अन् सामाजिक बांधिलकी
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे सिग्नल शाळेच्या भटू सावंत यांना धनादेश देताना
SHARES

आपल्या विनोदी अभिनयानं अबालवृद्धांना हसवणाऱ्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीनं वाढदिवसाचं औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपली आहे. इतरांसमोर वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श ठेवत पुष्करनं सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

म्हैसकर फाऊंडेशनचे अनुया आणि जयंत म्हैसकर यांनी चेतना विकास संस्थेच्या पवन खेबुडकर यांना मा. आमदार ॲड. पराग अळवणी यांच्या उपस्थितीत निधी दिला.


पुष्कर शो THREE

पुष्कर श्रोत्रीनं नुकतंच वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यासोबतच त्याच्या कारकिर्दीला २५ वर्षेही पूर्ण झाली आहेत. हा सुवर्णयोग साधत पुष्करनं सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ‘पुष्कर शो THREE’ या विशेष उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या अंतर्गत रविवारी तीन नाटकांच्या प्रयोगांमधून जमा झालेली रक्कमेतून तीन सामाजिक संस्थाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली. विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये संपन्न झालेल्या ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमात ‘आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवी’ या तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. 

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अभिनेत्री व कलाश्रय वृद्धाश्रमाच्या संस्थापिका विशाखा सुभेदार यांना धनादेश दिला. सोबत एसबीआय लाईफ इन्श्युरन्सचे आनंद पेजावर

२ लाख रुपयांची मदत 

या सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, विलेपार्लेचे आमदार अॅड. पराग अळवणी, अजित तेंडुलकर, म्हैसकर फौंडेशनचे जयंत म्हैसकर, अनुया म्हैसकर, इंडियन ऑईलचे श्रीधर भागवत, एसबीआय लाईफ इन्श्युरन्सचे आनंद पेजावर, जाई काजळचे राजेश गाडगीळ, जनकल्याण सहकारी बँकेचे संतोष केळकर, अथर्व रिएल्टर्सचे सचिन गुंजाळ, बँक ऑफ इंडियाचे अशोक सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येक संस्थेला या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्येकी दीड लाख रुपये आणि विनोद तावडे, आशिष शेलार आणि पराग अळवणी यांनी प्रत्येकी एका संस्थेला ५० हजार रुपये अशी एकूण २ लाख रुपयांची मदत केली.


उत्पन्न विविध संस्थांना

‘पुष्कर शो THREE’ या उपक्रमांतर्गत आदी कल्चरटेन्मेंट निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप’ या प्रयोगाचं उत्पन्न ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’ संस्थेला देण्यात आलं, बदाम राजा निर्मित ‘अ परफेक्ट मर्डर’ या प्रयोगाचं उत्पन्न कोल्हापुरातील ‘चेतना’ संस्थेला, तर जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हसवा-फसवी’ च्या प्रयोगाचं उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथे उभ्या राहणाऱ्या ‘कलाश्रय’ या वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी देण्यात आलं.

या विषयी बोलताना पुष्कर म्हणाला की, नाट्यनिर्माते, सहकलाकार, प्रायोजक यांच्या सहकार्यानं हा उपक्रम यशस्वी झाला आहे. अभिनेता म्हणून नाट्य, चित्रपट रसिकांनी मला आजपर्यंत अप्रतिम दाद दिली आहे, या प्रयोगाच्या निमित्तानं मला साथ देऊन हे प्रयोग हाऊसफुल केल्याबद्दल मी रसिकांचा ऋणी आहे.



हेही वाचा -

EXCLUSIVE : ४७ वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा