Advertisement

'फटाक्यांची झाडं' सकल्पना आहे तरी काय?

लहानपणापासून फटाक्यांचा एकच उपयोग माहित होता तो म्हणजे फोडण्यसाठी. पण फटाके असे पर्यावरण जोपासणारे असतात हे पहिल्यांदाच ऐकलं.

SHARES

दरवर्षी आपण फटाके फोडून दिवाळी साजरी करतो. पण यावर्षी फटाके फोडून नाही तर 'फटाक्यांची झाडं' लावून दिवाळी साजरी करूया. 'फटाक्यांची झाडं' ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. फटाके लावली की झाडं उगवणार की झाड लावलं की त्याला फटाके लागणार, अशा संभ्रमात तुम्ही असाल.

पण फटाक्यांचं झाड कसं उगवणार? तुमच्यासारखा हा प्रश्न मलाही पडला. मग काय? ही संकल्पना जाणून घेण्यासाठी मी पर्यावरणप्रेमी आणि या संकल्पनेचा एक भाग असलेल्या अरुंधती म्हात्रे यांची बातचित केली. या संकल्पनेबद्दल ऐकताच मला धक्काच बसला.

लहानपणापासून फटाक्यांचा एकच उपयोग माहित होता तो म्हणजे फोडण्यसाठी. पण फटाके असे पर्यावरण जोपासणारे असतात हे पहिल्यांदाच ऐकलं. खरंतर या फटाक्यांच्या झाडाची खरी संकल्पना मला कळाली ती अरुंधतींकडून. दिसायला जरी ते फटाके असले तरी ते फुटणारे नाहीत. तर त्यात बिया आहेत.

सामाजिक कार्यकर्ता श्वेता भट्टड यांची ही संकल्पना आहे. ग्राम आर्थ संस्थेतर्फे या संकल्पनेला आकार दिला गेला आहे. मी या ग्राम आर्ट संस्थेचा एक भाग आहे. गेल्यावर्षी ग्राम आर्ट तर्फे सिड राखी बनवण्यात आली होती. यावर्षी त्यांनी सिड फटाके ही नवीन संकल्पना आणली आहे. फक्त एवढंच नाही तर सिड फायर क्रॅकरप्रमाणे त्यांनी सिड मिठाई ही देखील संकल्पना त्यांनी सुरू केली.

अरुंधती म्हात्रे

फटाके आणि मिठाई बनवण्यासाठी त्या रद्दी पेपरचा उपयोग करतात. म्हणजे रद्दीची व्हिलेवाट लावली जाते. यंदा त्यांनी सात प्रकारचे फटाके तर चार प्रकारच्या मिठाई तयार केल्या आहेत. या फटाक्यांमध्ये रद्दी पेपरपासून तयार केलेले सिड बॉल्स आहेत आणि त्यात वेगवेगळ्या बिया आहेत. अंबाडी, पालक, आपटे अशा २३ प्रकारच्या बियांचा वापर केला आहे. सर्वात महत्त्वाचं या संकल्पनेमुळे शंभरहून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे.     



हेही वाचा

पर्यावरणपूरक शेणाचे दिवे 'असे' बनतात, जाणून घ्या त्याचे फायदे

कोरोनामुळे फटाके उत्पादक, विक्रेत्यांचे मोठे नुकसान

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा