Advertisement

पर्यावरणपूरक शेणाचे दिवे 'असे' बनतात, जाणून घ्या त्याचे फायदे

शेणापासून बनवलेल्या पणत्यांचा पर्यावरणाला कसा फायदा होईल? लोकांच्या आरोग्यावर कसा चांगला परिणाम होईल याचं संशोधन करण्यात आलं आहे.

SHARES

दिव्यांना प्रकाशाचे प्रतिक मानले जातं. दिव्यांची ज्योत स्वत: जळून दुसऱ्यांचं आयुष्य प्रकाशमय करते. तसंच काहीसं काम मुंबईत राहणारे कल्याणा रमण यांनी केलं आहे. त्यांच्या शेणांच्या दिव्यांच्या संकल्पनेमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.


शेणाच्या दिव्यांची खासियत

मुंबईत राहणारे कल्याणा रमन यांना २०१७ साली शेणाच्या दिव्यांची संकल्पना सुचली. त्यांना कळाले की शेतकरी गाईचं शेण ५० पैशात किलोग्राम विकायचे. तेव्हा संकल्पनेवर काम करून त्यांनी गाईंच्या शेणापासून पणत्या तयार केल्या. फक्त पणत्या तयार केल्या नाहीतर तर त्यावर संशोधन देखील केलं. या पणत्यांचा पर्यावरणाला कसा फायदा होईल? लोकांच्या आरोग्यावर कसा चांगला परिणाम होईल याचं संशोधन केलं.

कशापासून बनतात?

कल्याणा रमण यांनी पंचगव्य असं नाव या पणत्यांना दिलं आहे. कारण गाईपासून मिळणाऱ्या ५ घटकांचा यात समावेश आहे. गाईचे दुध, गोमूत्र, शेण, दही आणि तूप यांच्यापासून पंचगव्य दिवे तयार केले जातात. हे दिवे जैव विघटनशील आहेत.

रोजगार उपलब्ध

कल्याणा रमण यांच्या संकल्पनेमुळे आनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागात अनेक महिला दिवसाला १२०० पणत्या बनवून देण्याचं काम करत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांकडून शेण विकत घेतल्यानं त्यांना देखील फायदा होत आहे.

देशातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. पण योग्य दरात शेण विकून शेतकरी पैसा कमावत आहे. यात शेतकऱ्यांचा, दिवे बनवणाऱ्या कारागारांचा फायदा आहे. जवळपास १५० गावांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार उपलब्ध झाला आहे. एकप्रकारे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं उचलेलं एक पाऊल आहे.

कल्याणा रमण


शेणाच्या दिव्याचे फायदे

  • बाजारात विकले जाणारे मातीच्या दिव्यांमध्ये आणि शेणाच्या दिव्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे.
  • मातीचे दिवे बनवताना पाणी अधिक लागते. त्यामुळे एकप्रकारे पाण्याची नासाडीच होते. याच्या उलट शेणाचे बनवताना आणि बनवून झाल्यानंतरही पाण्याचा अंशत: वापर होत नाही.
  • शेणाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पूर्णपणे पेट घेतात. त्यातून निघणारा धूर मच्छर आणि किटक दूर होतात.
  • दिव्यापासून निर्माण झालेली विभूतीचा देखील तुम्ही पुरेपूर वापर करू शकता. त्यापासून दात घासले जातात, झाडांना टाकू शकता, याशिवाय ड्रेनेज लाईन देखील साफ करू शकता. कारण गाईचं शेण हे किटकनाशकचं काम करतं.
  • दिव्यातून कार्बनचं अजिबात उत्सर्जन होत नाही. तर १०० टक्के प्राणवायू सोडला जातो.


मुंबई IITचं योगदान

दिवे बनवण्यासाठी खासप्रकारचं मशीन बनवण्यात आलं आहे. मशीनच्या मदतीनं दबाव तंत्राचा वापर करून दिव्याच्या आकाराच्या पणत्या तयार केल्या जातात. IIT बॉम्बेच्या दोन प्राध्यापकांच्या मदतीनं ही मशीन बनवण्यात आली आहे.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा