ठाण्यात उभारले शिवरायांचे जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (chhatrapati shivaji maharaj jayanti 2021) ठाण्यात जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट (Mosaic portrait) तयार करण्यात आले आहे. पुढील २ दिवस हे भव्य पोट्रेटचे पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

ठाण्यातील जांभळी नाका इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात १० तरुणांनी ३ दिवस अथक परीश्रम घेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे पोट्रेट बनवले आहे. सकल मराठा संस्थे मार्फत हे भव्य पोट्रेट बनवले गेले आहे. या पोट्रेटचे मुख्य मोझॅक कलाकार हे चेतन राऊत आहेत. त्यांनी या पोट्रोट करता ५० हजार दिव्यांचा वापर केला आहे. ज्यात हिरवा, काळा, निळा, लाल, पांढरा आणि पिवळ्या रंगाचे हे दिवे आहेत.

30 फुट बाय 40 फुटांचे हे पोट्रेट आहे. २० फुटांवरुन सोशल मीडिया डिस्टंसिंगचे नियम पाळून नागरिकांना हे पोट्रेट पाहायला मिळणार आहे. १८, १९ आणि २० फेब्रुवारी हे पुढील तीन दिवस हे पोट्रेट पाहण्याचा आनंद नागरिक लुटू शकतात. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत हे पोट्रेट पाहण्याचा आनंद लुटावा, असं आवाहन देखील या निमित्तानं आयोजकांनी केलं आहे.


हेही वाचा

कलाविष्कार! ५००हून अधिक पीव्हीसी पाईप्सवर साकारले निसर्गचित्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाखांचं अनुदान

पुढील बातमी
इतर बातम्या