Advertisement

कलाविष्कार! ५००हून अधिक पीव्हीसी पाईप्सवर साकारले निसर्गचित्र

प्रत्येक पीव्हीसी पाईपवर निसर्ग, हरीण, पक्षी, वाघ, मोर अशी जैवविविधता रेखाटण्यात आली आहेत.

कलाविष्कार! ५००हून अधिक पीव्हीसी पाईप्सवर साकारले निसर्गचित्र
SHARES

कधी पेंटीग्स, तर कधी शिल्पकृतीच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार एखादी थीम, एखादी भावना नजरेसमोर ठेवत आपली नाविन्यपूर्ण कला कलारसिकांसमोर सादर करत असतो.

'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' विजेते बिभूति अधिकारी यांचा त्यांची प्रत्येक कलाकृती बनवण्यामागे 'सकारात्मकतेचा संदेश' देण्याचा प्रयत्न असतो.

'निसर्ग, मनुष्य आणि माझ्या देशासाठी सकारात्मक ठरणारे' ही भावना मनाशी ठेवत बिभूति यांनी 'फेथ अँड फ्युरी-अन्विलिंग द एक्सेंट्रिक' या शिर्षकाअंतर्गत ३५ वैविध्यपूर्ण पेंटीग्स आणि १ आर्ट इन्स्टॉलेशन साकारले आहे. या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १६ ते २२ फेब्रुवारी २०२१ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित केले जाणार आहे.

लॉकडाऊननंतर प्रथमच जहांगीर आर्ट गॅलरी सुरू होणार असून या अनोख्या कलाकृतींचे प्रदर्शन कलारसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारे वर्ल्डस फर्स्ट इनोव्हेटिव्ह पेंटिंग 'द रोलिंग पेंटिंग' या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. ५९४ पीव्हीसी पाईप्सचा वापर करून 5ft x 4ft उंचीची ही पेंटिंग बनवली आहे.

प्रत्येक पीव्हीसी पाईपवर निसर्ग, हरीण, पक्षी, वाघ, मोर अशी जैवविविधता रेखाटण्यात आली आहेत. विशिष्ट पद्धतीने या पाईप्स रोल केल्यावर तब्बल १२ विविध पेंटीग्स पहायला मिळतात. अशा पद्धतीची पेंटींग कलारसिकांना प्रथमच बघायला मिळणार आहे.

आर्टिस्ट, स्कल्पचर, कार्टूनिस्ट, कॅरिकेचरिस्ट असणारे बिभूति अधिकारी मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. रंगांची आवड असणाऱ्या बिभूति यांनी डिजिटल, स्ट्रोक्स, ब्रश ते केवळ बोटांचा वापर करत अनेक कला साकारल्या आहेत. सतत काहीतरी नवीन करण्याची जिद्द असणाऱ्या बिभूति यांनी पहिल्यांदाच पीव्हीसी पाईप्सचा वापर करत पेंटिंग बनवण्याचे ठरविले.

प्रदर्शनामध्ये Winning Horse, The Performer, Cheerharan – Kal bhi Aaj bhi, Act of Kindness, Motherhood, Deedar-e-Elahi, Love Beyond Language, Wild Fire, Manimal या शीर्षकांतर्गत साकारलेली विविध पेंटीग्स सुद्धा पाहता येतील.

चिरहरण – कल भी आज भी हे पेंटिंग पूर्वी स्त्रियांवर होणाऱ्या शोषणाचे प्रतिकात्मक चित्र आहे. Motherhood हे पेंटिंग प्रत्येक आईला, प्रत्येक स्त्रीला समर्पित आहे. प्रत्येक पेंटींगद्वारे बिभूति यांनी एक सकारात्मक आणि सामाजिक संदेश दिला आहे.

बिभूति यांनी आर्ट डिरेक्टर म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली असून त्यांची स्वतःची इव्हेंट्स आणि एक्झिबिशनची कंपनी आहे. डिझाईनिंग, इन्स्टॉलेशनपासून ते प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडणाऱ्या परेडमधील भव्य कलाकृती साकारण्यापर्यंतचा बिभूति यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कला स्पर्धांमध्ये भाग घेतला असून पारितोषिकांचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांच्या एका इनोव्हेटिव्ह पेंटींगला 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे.हेही वाचा

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना जाहीर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा