Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना जाहीर

हे पुरस्कार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना जाहीर
SHARES

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार- रंगनाथ पठारे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर श्री. पू. भागवत पुरस्कार: शब्दालय प्रकाशन, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार: डॉ.सुधीर रसाळ, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. 

मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत असून मराठी भाषा दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, असंही देसाई यांनी सांगितलं. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.

हे पुरस्कार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत असून मराठी भाषा दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, असेही देसाई यांनी सांगितले.

‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. पठारे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पद भूषविलेले आहे.

श्री. पु. भागवत पुरस्कार नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरुप ३  लाख रुपये , मानचिन्ह व मानपत्र असे आहे. या प्रकाशन संस्थेद्वारे महाराष्ट्रात आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी ‘शब्दालय’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.

“मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” यावर्षी डॉ. सुधीर रसाळ, संभाजीनगर यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरुप २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. डॉ. रसाळ यांनी डॉ.बा बासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले असून गेली ६० वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात लेखन करीत आहेत.

कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी २ लाख रुपये रोख मानचिन्ह व मानपत्र असे आहे.हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा