Advertisement

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?

मुंबईत ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न असून, काही ठिकाणी जागा आहेत.

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?
SHARES

राज्यभरात ५० ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यात येणार आहेत. मात्र, मुंबईत जागेचा प्रचंड अभाव असल्यानं सुट्टीच्या दिवशी शाळा आणि कॉलेजातील मोकळ्या जागांवर अशी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, यासाठी या ठिकाणांची चाचपणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न असून, काही ठिकाणी जागा आहेत. मात्र, त्याचा वाहन प्रशिक्षणासाठी वापर करता येणार नाही. शाळा आणि कॉलेजातील मोकळ्या जागांचा वापर शनिवार- रविवार सुटीच्या दिवसांत मोटार ट्रेनिंग स्कूलसाठी वापरता येऊ शकतात. ज्या शैक्षणिक संस्था स्वतः मोटार ट्रेनिंग सेंटर चालविण्यासाठी उत्सुक असतील त्यांनाही यासंदर्भात प्राधान्याने मंजुरी देण्यात येणार असल्याचं समजतं.

राज्यात २२ ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक

मुंबई (मध्य), मुंबई (पश्चिम), मुंबई (पूर्व), ठाणे (नांदिवली), ठाणे (मर्फी), पनवेल, पेण, पुणे (आळंदी), पुणे (सासवड), पुणे (हडपसर), धुळे, अमरावती, अमरावती (बडनेरा), नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण), नाशिक, नांदेड, लातूर, कोल्हापूर, कराड, नागपूर (ग्रामीण) आदी २२ ठिकाणच्या ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक उभारण्यात येणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा