लवकरच अभिनेते अनुपम खेर यांची मुख्य भुमिका असणारा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारीत 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरूवात झाली आहे. यातील मनमोहन सिंग यांच्या रूपातील अनुपम खेर यांचा फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू यांनी 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर – मेकिंग अॅँड अनमेकिंग अॉफ मनमोहन सिंग'या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या रादकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे. याच पुस्तकाच्या कथानकावर आधारीत हा चित्रपट आहे. अनुपम खेर यांच्या व्यतिरिक्त अभिनेता अक्षय खन्ना आणि अभिनेत्री आहाना कुमरा या चित्रपटातून झळकणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रत्नाकर गुट्टे करत आहेत. संजय बारू यांच्या या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्या कामकाजात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हस्तक्षेप असायचा. शिवाय मनमोहन सिंग यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हतं, असं या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. पण कॉंग्रेसने हे आरोप धुडकावून लावले आहेत.
हेही वाचा