अनुपम खेर होणार पंतप्रधान

Mumbai
अनुपम खेर होणार पंतप्रधान
अनुपम खेर होणार पंतप्रधान
See all
मुंबई  -  

अभिनेता अनुपम खेर लवकरच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. संजय बारू यांचे पुस्तक 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर - द मेकिंग एंड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' यावर आधारित चित्रपटात ते झळकणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शक रत्नाकर गुट्टे असून चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होईल. पण अजून या चित्रपटाची संहिता लिहिली नाही. संहिता तयार झाल्यानंतर चित्रपटातील बाकी कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. संजय बारु २००४ ते २००८ पर्यंत पंतप्रधान कार्यालयात मनमोहन सिंह यांचे माध्यम सल्लागार होते. बारु यांनी आपल्या पुस्तकात दावा केला होता की, मनमोहन सिंग यांच्या कामकाजात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हस्तक्षेप असायचा. पण काँग्रेसनं हा दावा धुडकावून लावला. शिवाय मनमोहन सिंग यांना त्यांच्या कार्यकाळात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, हे सुद्धा या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.