अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान खान लवकरच भारतात परतणार आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइम ट्यूमर हा दुर्धर आजार झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर उपचारासाठी तो लंडनला गेला होता. आता मात्र तो लवकरच भारतात येणार असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं कळतंय.
गेल्या सात महिन्यांपासून इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतिविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केली होती. अनेकांनी तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना देखील केली होती. आता तो भारतात परत येत आहे ही चांहत्यांसाठी आनंदाची बातमी झालीच. पण चाहत्यांचा आनंद आम्ही आणखी वाढवत आहोत. इरफान लवकरच हिंदी मिडियम या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. येत्या एक दोन दिवसांत तो मुंबईत परतेल. त्यानंतरच शूटिंगला सुरुवात होईल. या सर्वाचा अर्थ असा असू शकतो की आता इरफानच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदी मिडियमचे निर्माते लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला चित्रपटाची कथा ऐकवली. त्यानंतर त्याने सिक्वलमध्ये काम करण्यास होकार दिला. २०१७ साली इरफानचा हिंदी मिडियम चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा निर्णय झाला होता.हेही वाचा