Advertisement

सीआयडीला फक्त २ महिन्यांचा ब्रेक, सोनी टिव्हीचं स्पष्टीकरण

२८ आॅक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होईल. मात्र ही मालिका कायमस्वरूपी बंद होत नसून केवळ काही काळासाठी ब्रेक घेत असल्याचं सोनी वाहिनीने स्पष्ट केलं आहे.

सीआयडीला फक्त २ महिन्यांचा ब्रेक, सोनी टिव्हीचं स्पष्टीकरण
SHARES

प्रेक्षकांच्या मनावर गारूड करणारी सीआयडी ही मालिका बंद होणार असल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून प्रेक्षक काहीसे नाराज झालेत खरे, परंतु ही मालिका २ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, असं स्पष्टीकरण सोनी वाहिनीने दिल्याने प्रेक्षकांची नाराजी नक्कीच दूर होईल.


प्रेक्षकांच्या मनावर गारूड

सोनी टिव्हीवरील सीआयडी ही मालिका १९९७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित करण्यात आली होती. तेव्हापासून सलग २१ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर गारूड करत आहे. शनिवार-रविवार रात्री १०.३० वाजले की प्रेक्षक आजही टीव्हीसमोरून हालत नाहीत. एसीपी प्रद्युम्न, सिनियर इन्स्पेक्टर अभिजीत, दया, डाॅक्टर साळुंके, फ्रेडरिक्स यांसारख्या पात्रांसोबतच त्यांचे डायलाॅगही प्रेक्षकांना तोंडपाठ झालेत.


वाहिनी, निर्मात्यांमध्ये वाद?

या मालिकेने नुकतेच दीड हजार भाग पूर्ण केले आहेत. फायर वर्क्स प्राॅडक्शनअंतर्गत बी. पी. सिंग आणि प्रदीप उपौर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. मात्र काही दिवसांपासून वाहिनी आणि निर्मात्यांमध्ये वाद असल्याच्या वावड्या उठत होत्या. तसंच नवीन मालिका सुरू करण्यासाठी वाहिनीने सीआयडी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात आहे.


शेवटचा भाग

त्यामुळे या मालिकेचे शेवटचे भाग आता प्रेक्षकांना पाहायला मिळतील. २८ आॅक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होईल. मात्र ही मालिका कायमस्वरूपी बंद होत नसून केवळ काही काळासाठी ब्रेक घेत असल्याचं सोनी वाहिनीने स्पष्ट केलं आहे.


येणार नवीन पर्व

ब्रेकनंतर सीआयडी नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. त्यात नवीन चेहरेही दिसतील असं म्हटलं जात आहे. आतापर्यंतच्या सीआयडीपेक्षा नवीन पर्व अधिक थरारक असेल, असंही म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

नवाजुद्दीन-आथिया खाणार ‘मोतीचूर’!

‘माझा अगडबम’मध्ये चमकणार ‘सैराट’ फेम तानाजी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा