Advertisement

‘माझा अगडबम’मध्ये चमकणार ‘सैराट’ फेम तानाजी

‘परश्या आर्ची आली...’, अशी साद घालणाऱ्या लंगड्या प्रदीपची भूमिका जगभर गाजवणारा तानाजी गालगुंडे आता एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी ‘माझा अगडबम’ या चित्रपटात त्याचं काहीसं बदलेलं रूपडं प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘माझा अगडबम’मध्ये चमकणार ‘सैराट’ फेम तानाजी
SHARES

काही कलाकार छोट्याशा भूमिकेतही आपली अशी काही छाप सोडतात की, त्यांची भूमिका जरी छोटी असली तरी ती इतकी लक्षवेधी ठरते की चित्रपटाप्रमाणे ते देखील हिट होतात. असे कलाकार त्यांच्या खऱ्या नावापेक्षा आॅनस्क्रीन नावानेच जास्त ओळखले जातात. ‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटात नायकाच्या मित्राची भूमिका साकारणारा तानाजी गालगुंडे ‘माझा अगडबम’ या चित्रपटात एका नव्या रूपात झळकणार आहे.


हटके स्टाईल 

‘परश्या आर्ची आली...’, अशी साद घालणाऱ्या लंगड्या प्रदीपची भूमिका जगभर गाजवणारा तानाजी गालगुंडे आता एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी ‘माझा अगडबम’ या चित्रपटात त्याचं काहीसं बदलेलं रूपडं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तानाजीने ‘वजने’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या वजनेची स्टाईल ‘सैराट’मधील प्रदीपपेक्षा काहीशी हटके असल्याने तानाजी पुन्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार यात शंका नाही.


नाजुकाच्या मित्राची भूमिका 

नाजुका नावाच्या एका लठ्ठ तरुणीची कथा सांगणारा दहा वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या चित्रपटाचा ‘माझा अगडबम’ हा सिक्वेल आहे. या चित्रपटामध्ये तानाजी शीर्षक भूमिकेत असलेल्या नाजुकाच्या मित्राची भूमिका करताना दिसेल. पेन इंडिया कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच लिखाण आणि दिग्दर्शनही तृप्ती भोईरनेच केलं आहे. 


येत्या शुक्रवारी प्रदर्शित 

टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांच्यासोबत तृप्तीने निर्मिती फळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या चित्रपटाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात तानाजी आणि नाजूका काय धम्माल करतात ते पाहायचं आहे.हेही वाचा - 

‘मुळशी पॅटर्न’मध्ये पुरुषोत्तममधील पुरस्कार विजेत्यांची जुगलबंदी!

अभिनेत्रीच्या गाडीची काच फोढून 72 हजारांचा ऐवज लंपास
संबंधित विषय
Advertisement