Advertisement

‘मुळशी पॅटर्न’मध्ये पुरुषोत्तममधील पुरस्कार विजेत्यांची जुगलबंदी!

पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेत पारितोषिक मिळणं म्हणजे कलाकारांच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखं आहे. या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिकं मिळवलेले बरेच कलाकार ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

‘मुळशी पॅटर्न’मध्ये पुरुषोत्तममधील पुरस्कार विजेत्यांची जुगलबंदी!
SHARES

महाविद्यालयीन तरुणाईच्या कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत पारितोषिक मिळणं म्हणजे कलाकारांच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखं आहे. या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिकं मिळवलेले बरेच कलाकार ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.


'या' कलाकारांना पुरस्कार

  • बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचं अनंत नारायण आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचं नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेलं आहे.
  • अभिनेता उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, अनिरुद्ध दिंडोरकर यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचं नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक पटकावलेलं आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीज दाते, देवेंद्र सारळकर यांनी ‘नटवर्य केशवराव दाते पारितोषिक’ आपल्या नावे केलं आहे.
  • शैलेश देशमुख यांना निर्मल पारितोषिक, स्नेहल तरडे यांना माई भिडे आणि अक्षय टंकसाळे यांना काकाजी जोगळेकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे.


कलाकार वेगळ्या अंदाजात

पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेले कलाकार-तंत्रज्ञ एकाच चित्रपटात काम करत असल्याचा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’मध्ये जुळून आला आहे. उपेंद्र लिमयेपासून सर्वच कलाकारांचा एक वेगळा अंदाज या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित हा चित्रपट २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा - 

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची झलक

मराठी सिनेमाला मल्याळमचा रॉकींग स्पर्श

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा