Advertisement

मराठी सिनेमाला मल्याळमचा रॉकींग स्पर्श

मराठी चित्रपट आशयसंपन्न असतो. त्यामध्ये खूप विविधता असते. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचा आनंद अाहे.

मराठी सिनेमाला मल्याळमचा रॉकींग स्पर्श
SHARES

मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांचा ट्रेंड बदलत आहे. मराठी चित्रपटांमधली वाढती प्रयोगशीलता आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे बॉलीवूडसह अनेक प्रादेशिक कलावंतांनाही मराठी चित्रपटसृष्टी कायम खुणावत आली आहे. आता तेवढ्यावरच न थांबता, मल्याळम सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव मराठीत पदार्पण करत आहे.


सुंदर प्रेमकथा 

दिग्दर्शक सिजो रॉकी यांचा ‘प्रीतम’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विझार्ड प्रोडक्शनच्या माध्यमातून नव्या धाटणीची एक सुंदर प्रेमकथा प्रीतमच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिजो रॉकी आणि विझार्ड प्रोडक्शन मल्याळम इंडस्ट्रीमधील खूप मोठं नाव आहे. चित्रपटसृष्टीसोबतच निर्मिती आणि जाहिरातक्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी बऱ्याच लघुपटांची निर्मितीही केली आहे.


मराठी चित्रपट आशयसंपन्न

‘प्रीतम’च्या निमित्ताने मल्याळम चित्रपटांकडून मराठीकडे वळण्याबाबत सिजो रॉकी म्हणाले की, मराठी चित्रपट आशयसंपन्न असतो. त्यामध्ये खूप विविधता असते. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचा आनंद अाहे. या चित्रपटाची निर्मिती फैझल निथिन सिजो करत आहेत.


कोकणात  चित्रीकरण

संवाद आणि पटकथा गणेश पंडित यांनी लिहिली असून, गीतं गुरु ठाकूरची आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करणार असून, संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश, तर संगीत विश्वजीत यांचं आहे. जयकुमार नायर आणि रफिक टी. एम. चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गणेश दिवेकर या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच कोकणात सुरुवात होणार आहे.



हेही वाचा -

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची झलक

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार ‘सुलतान शंभू सुभेदार’!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा