Advertisement

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची झलक


बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची झलक
SHARES

अभिनय आणि लेखनासोबतच ‘देऊळ बंद’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेला प्रविण तरडेने पदार्पणातच सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं. त्यामुळे यानंतर प्रविण काय करणार? याची उत्सुकता लागली होती. श्री स्वामी समर्थांवर आधारीत असलेल्या ‘देऊळ बंद’नंतर प्रविण ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाची झलक नुकतीच रिव्हील करण्यात आली आहे.


प्रदर्शनाची तारीख जाहीर

‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे घोषित करण्यात आली आहे. एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला ‘मुळशी पॅटर्न’ दिवाळीनंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


चित्रपटात भाईटम साँग

‘अराररा खतरनाक...’ या गाण्यामुळे सध्या तरुणाईमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ची जोरदार चर्चा सुरू आहे. अत्यंत वेगाने व्हायरल झालेल्या, आयटम साँगच्याच धर्तीवर बनलेल्या या भाईटम साँग नेटकऱ्यांना खूप भावलं आहे. अल्पावधीत तब्बल पंधरा लाखांहून अधिक व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत. या गाण्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर आता अतिशय हटके अंदाजातील मोशन पोस्टर रिलीज करण्यात आल्यानं तरुणाईची उत्कंठा अधिक ताणली जाणार आहे.


'अख्ख्या देशाची गोष्ट'

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात प्रविणने शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव दाखवलं आहे. ‘मुळशी पॅटर्न’मध्ये मराठी चित्रटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांसोबत प्रविणनेही अभिनय केला आहे. ‘एका तालुक्याची नाही, अख्ख्या देशाची गोष्ट’ अशी टॅगलाईनसह प्रदर्शनासाठी सज्ज झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’मधील कलाकारांची नावं लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचं समजतं.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा