Advertisement

अभिनेत्रीच्या गाडीची काच फोढून 72 हजारांचा ऐवज लंपास

अभिनेत्री मोहिना सिंगच्या गाडीची काच फोडून तिचा मोबाइल आणि 72 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहिनाने बांगूरनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्रीच्या गाडीची काच फोढून 72 हजारांचा ऐवज लंपास
SHARES

'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मोहिना सिंगच्या गाडीची काच फोडून तिचा मोबाइल आणि 72 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहिनाने बांगूरनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


72 हजारांचं समान चोरीला

महालक्ष्मी परिसरात कुटुंबियांसोबत राहणारी मोहिना सिंग ही शनिवारी रात्री आपल्या मित्रांसोबत मालाड बांगूरनगर परिसरात असलेल्या इनऑर्बिट मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी तिने आपली मर्सिडिज मॉलबाहेरल रस्त्यावर पार्क केली होती. खरेदी करताना कोणाचाही त्रास नको म्हणून तिने आपला मोबाइल गाडीतच ठेवला.


पोलिसांत केली तक्रार

खरेदी करून ज्यावेळी मोहिना घरी जाण्यासाठी पुन्हा गाडीजवळ आली. त्यावेळी तिच्या मर्सिडिज कारची काच फुटलेली आढळली. याशिवाय कारमधील मोबाइल, केन बास्केट, आणि दोन मेकअपबॅग असा 72 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचं आढळून आलं. याप्रकरणी मोहिनीने बांगूरनगर पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध घेत आहेत.


हेही वाचा - 

नशा बेतला जीवावर, कार अपघातात एकाच मृत्यू, दोन जखमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा