Advertisement

दिवाळीत २ तासच फोडता येणार फटाके!

देशभरात सरसकट फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. यावेळी कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची विक्री व्हावी, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ऑनलाइन विक्रीला मात्र कोर्टाने पूर्णपणे बंदी घातली आहे.

दिवाळीत २ तासच फोडता येणार फटाके!
SHARES

ऐन दिवाळीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने फटाके फोडण्यावर बंधनं लादत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. मंगळवारी फटाके विक्रीला सशर्त परवानगी देतानाच कोर्टाने ऑनलाइन फटाके विक्रीला मात्र बंदी घातली आहे. तर दिवाळीत रात्री ८ ते १० च्या दरम्यानच फटाके फोडता येणार असल्याचं बंधनही कोर्टाने लादलं आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत फक्त दोन तासच फटाके फोडता येणार आहे. याशिवाय नवीन वर्षासाठी नागरिकांना रात्री ११.४५ ते १२.३० पर्यंत फटाके फोडता येणार आहेत.


फटाके फोडण्यावर बंधन

देशभरात सरसकट फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. यावेळी कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची विक्री व्हावी, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ऑनलाइन विक्रीला मात्र कोर्टाने पूर्णपणे बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त दिवाळीच्या रात्री १० वाजेपर्यंत, तर नवीन वर्षाला रात्री ११.४५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत फटाके फोडता येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.


ग्रीन फटाक्यांना परवानगी

फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी त्यांच्या विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यावेळी कमी प्रदूषण करणारे ग्रीन फटाके विकण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे.


हेही वाचा - 

मुंबईतील 'ही' ठिकाणं 'शांतता क्षेत्र' म्हणून घोषित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा