Advertisement

मुंबईतील 'ही' ठिकाणं 'शांतता क्षेत्र' म्हणून घोषित


मुंबईतील 'ही' ठिकाणं 'शांतता क्षेत्र' म्हणून घोषित
SHARES

श्रावणाच्या आगमनानंतर सण-उत्सवांची चाहूल लागते आणि या उत्सवांच्या निमित्ताने आवाजाची पातळी ओलांडून ध्वनी प्रदूषण होतं. आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान आवाजाची पातळी ओलांडून ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 110 ठिकाणं आता 'शांतता क्षेत्र' म्हणून घोषित केली आहेत.


तर कारवाई

शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी रात्री दहा ते सकाळी सहा यावेळेत लाऊडस्पीकर, फटाके, वाद्य वाजवण्यास सक्त बंदी असेल. शांतता क्षेत्रात वर्गवारी करत वेगवेगळ्या ठिकाणी 50 ते 75 डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या क्षेत्रात ध्वनिप्रदूषण नियमांचं उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार 5 वर्ष कैद. एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.


नियमांचं उलंघन झाल्यास...

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सणांच्या कालावधीत होणारं ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवाय नियमांचं उलंघन झाल्याचं आढळून आल्यास जागरूक नागरिकांना तक्रार करता येण्यासाठी सरकारने दूरध्वनी क्रमांक, ईमेल, व्हॉट्सअॅप क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत.


येथे करा तक्रार


  • 23089855, 23719857, 26457900
  • addlcpsouth@gmail.com, acpcentralopr.mum@mahapolice.gov.in
  • 9987093065, 9302100100

जर पहिल्या कारवाईनंतरही पुन्हा उल्लंघन झालं तर दररोज 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. याशिवाय कलम 15(1)नुसार शिक्षा झाल्यापासून एक वर्षपर्यंतच्या काळात पुन्हा असा गुन्हा केल्यास 7 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.


'या' स्थळांचा समावेश

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शांतता क्षेत्रामध्ये रुग्णालये, शाळा, कॉलेजे, प्रार्थनास्थळे, न्यायालयाचा समावेश आहे. शहर आणि उपनगरातील अनेक स्थळे या यादीत आहेत. यामध्ये केईएम रुग्णालय, रुपारेल कॉलेज, माऊंट मेरी चर्च, बाणगंगा, बॉम्बे रुग्णालय, सिडनहॅम कॉलेज, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, साठे कॉलेज, पार्ले टिळक विद्यालय यांचा समावेश आहे.


शाळा-महाविद्यालय

  • जयहिंद कॉलेज
  • अवर लेडी ऑफ अवर हायस्कूल 
  • फेलोशिप हायस्कूल
  • सोफिया कॉलेज
  • सेंटर मेरी इंग्रजी शाळा 
  • साधना विद्यालय
  • एस. आय. ई. एस. कॉलेज
  • डॉन बास्को
  • यू. आय. सी. टी. कॉलेज
  • व्ही. जे. टी. आय कॉलेज
  • राजा शिवाजी विद्यालय
  • सोमय्या वैद्यकीय कॉलेज 
  • आदर्श नगर मराठी शाळा क्र. २
  • लाला लजपतराय कॉलेज
  • प्रभादेवी कॉन्व्हेंट हायस्कूल
  • रुपारेल कॉलेज
  • मुंबई विद्यापीठ
  • एन. डी. कॉलेज
  • टी. एस. इंजिनीअरिंग कॉलेज
  • सेंट जोसेफ शाळा 
  • मुंबई एज्युकेशन ट्रस्ट
  • साठे कॉलेज
  • पार्ले टिळक विद्यालय
  • सरस्वती बाग मनपा शाळा
  • भवन्स कॉलेज
  • मिठीभाई कॉलेज
  • एच. एम. आय. एम. एस. भोगूबाई कॉलेज
  • सेंट जॉर्ज शाळा
  • मित्तल कॉलेज
  • ठाकूर तंत्रविद्यानिकेतन
  • पोईसर मनपा. शाळा
  • मदर टेरेसा इन्स्टिट्यूट
  • दत्तपाडा चोगले माध्यमिक शाळा 
  • अभियांत्रिकी कॉलेज 
  • एस. व्ही. पी. कॉलेज 
  • इडन हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज 
  • केदारनाथ विद्या प्रसारणी संचालित स्वदेशी मराठी शाळा 
  • पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज 
  • आरसीएफ पालिका शाळा 
  • एस आणि ए. के. पॉलिटेक्निक
  • विवेकानंद कॉलेज 
  • तुळसी टेक्निकल  
  • विवेकानंद शाळा 
  • मॉर्डन इंग्लिश शाळा 
  • मनपा शाळा क्र.१,२,३, 
  • के. जे. सोमय्या कॉलेज 
  • पी. जी. गरोडिया शाळा 
  • फातिमा हायस्कूल 
  • कांजूरगाव मनपा शाळा 
  • आय. टी. आय. मुलुंड (पू.) 
  • केळकर महाविद्यालय


न्यायलये

  • शहर दिवाणी न्यायालय 
  • गिरगाव न्यायालय
  • उच्च न्यायालय
  • भोईवाडा न्यायालय
  • शिवडी जलदगती न्यायालय
  • शिंदेवाडी न्यायाल
  • अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी न्यायालय व लघुवाद न्यायालय
  • कामगार व औद्योगिक न्यायालय
  • विलेपार्ले न्यायालय
  • ए. के. वैद्य रोड न्यायालय
  • दिंडोशी न्यायालय
  • बोरिवली न्यायालय
  • मुलुंड न्यायालय


रुग्णालये

  • जे. जे. रुग्णालय
  • श्रीमती कमलादेवी मित्तल आयुर्वेदिक रुग्णालय
  • ब्रीच कँडी रुग्णालय 
  • रिलायन्स रुग्णालय 
  • जसलोक रुग्णालय
  • प्रिन्स अली खान रुग्णालय
  • मसीना रुग्णालय
  • माझगाव न्यायालय
  • नायर रुग्णालय
  • सोमय्या रुग्णालय
  • के. ई. एम. रुग्णालय
  • पोद्दार रुग्णालय
  • एफ. पी. एच. रुग्णालय
  • हिंदुजा रुग्णालय
  • व्ही. एन. देसाई पालिका रुग्णालय
  • होली फॅमिली रुग्णालय
  • ट्रॉमा केअर रुग्णालय
  • सेव्हन हिल्स रुग्णालय
  • कूपर रुग्णालय
  • ई. एस. आय. एस. रुग्णालय
  • चारकोप मॅटर्निटी होम
  • भगवती रुग्णालय
  • कोहिनूर रुग्णालय 
  • लुंबिनी बाग 
  • शताब्दी हॉस्पिटल 
  • राजावाडी म्युनसिपल जनरल रुग्णालय 
  • सर्वोदय रुग्णालय 
  • नेव्हल रुग्णालय 
  • आयआयटी रुग्णालय 
  • हिरानंदानी रुग्णालय 
  • वोकार्ट रुग्णालय
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा