अनुष्का शर्मा फोर्ब्सच्या यादीत!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • बॉलिवूड

अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स ३० अंडर ३० आशिया २०१८ च्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. आपल्या क्षेत्रात इतरांच्या तुलनेत वेगळी कामगिरी करणाऱ्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. भारतीय चित्रपट विश्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये अनुष्काला या यादीत २९ वं स्थान देण्यात आलं आहे.

असा होता अनुष्काचा प्रवास...

२००७ मध्ये अनुष्काने आपल्या करिअरला सुरूवात केली. अनुष्काचा पहिलाच चित्रपट 'रब दे बना दी जोडी' सुपरहिट ठरला आणि खऱ्या अर्थाने अनुष्काची चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरूवात झाली. या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. नुकताच तिचा 'परी' हा चित्रपट रिलीज झाला. लवकरच ती शाहरूख खान बरोबर 'झीरो' तर वरूण धवनबरोबर 'सुई धागा' या चित्रपटात दिसणार आहे.

याव्यतिरिक्त अनुष्काने बॅण्ड बाजा बारात, जब तक है जान, पीके, बॉम्बे बेलवेट, दिल धडकने दो, ऐ दिल है मुश्किल, जब हॅरी मेट सेजल, सुलतान या चित्रपटातून अनुष्का सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली. त्याप्रमाणे तीने फिलौरी, एनएच १० आणि परी या चित्रपटांची निर्मितीही केली.

अनुष्काने केवळ अभिनयातच नाही, तर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप सोडली. अनुष्काबरोबरच भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या नावाचाही या लिस्टमध्ये समावेश आहे.


हेही वाचा

म्हणून नकोय विराट-अनुष्काला वरळीतला फ्लॅट!

पुढील बातमी
इतर बातम्या