Advertisement

म्हणून नकोय विराट-अनुष्काला वरळीतला फ्लॅट!

विराट-अनुष्काने वरळीतील ओमकार १९७३ या इमारतीतील लक्झरिअस फ्लॅट ३४ कोटी रुपयांना बुक केलं होतं. या घराचा ताबा २०१९ मध्ये मिळणार होता. पण हा ताबा मिळण्याआधीच विराट आणि अनुष्कानं या घराचं डिल रद्द केलं आहे.

म्हणून नकोय विराट-अनुष्काला वरळीतला फ्लॅट!
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बाॅलिवूडमधील आघाडीची नायिका अनुष्का शर्मा लग्नानंतर मुंबईकर झाले आहेत. सध्या ते वरळीतील रहेजा लिजन्ड इमारतीत भाड्यानं राहत आहेत. कारण त्यांना प्रतिक्षा होती ती स्वत:च्या हक्काचं घर ताब्यात येण्याची. त्यासाठी त्यांनी एका आलिशान इमारतीत लक्झरिअस फ्लॅटही बुक केला होता. पण काही कारणांनी त्यांनी हे बुकींग रद्द केल्याने त्यांना अजून काही काळ भाड्यानेच रहावं लागणार आहे.


कुठे केला होता फ्लॅट बुक?

विराट-अनुष्काने वरळीतील ओमकार १९७३ या इमारतीतील लक्झरिअस फ्लॅट ३४ कोटी रुपयांना बुक केलं होतं. या घराचा ताबा २०१९ मध्ये मिळणार होता. पण हा ताबा मिळण्याआधीच विराट आणि अनुष्कानं या घराचं डिल रद्द केलं आहे.

नव्या जोडप्याचं नवं घर कसं असेल? याची जोरदार चर्चा सुरू असताना विराट-अनुष्कानं घराचं डिल रद्द का केलं? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर या मागचं कारण आहे अनुष्काचा हट्ट.इथंच हवाय फ्लॅट...

अनुष्काला वरळीत नव्हे, तर वांद्रे ते वर्सोवादरम्यानच्या परिसरात फ्लॅट हवा असून अनुष्काच्या सांगण्यावरून विराटनं वरळीतील ३४ कोटीच्या फ्लॅटचा डील रद्द केल्याची चर्चा आहे.


किती कोटींचा फ्लॅट?

अनुष्काचं वर्सोव्याला बद्रीनाथ टाॅवरमध्ये हक्काचं घर आहे. पण दोघांचं एकत्रित घर असावं, लग्नानंतर कायमस्वरूपी मुंबईत वास्तव्य करता यावं म्हणून विराटनं ओमकार बिल्डरच्या वरळीतील ओमकार १९७३ प्रकल्पात ७००० चौ. मीटरचा फ्लॅट काही महिन्यांपूर्वी खरेदी केला. ३५ व्या मजल्यावरील या फ्लॅटची १ कोटी ६० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क)ची रक्कमही विराटनं भरली.

असं असताना २० मार्चला विराटनं वरळीतील या फ्लॅटचं डिल रद्द केलं असून विराट-अनुष्का आता नव्या घराच्या शोधात आहेत. सध्या ते वांद्रे ते वर्सोव्यादरम्यान नवं घर शोधत असल्याचं समजतं आहे.हेही वाचा-

विराट कोहलीला संधी देऊन मी नोकरी गमावली - दिलीप वेंगसरकर

बटर चिकन, मुघलई चिकन माझी फेव्हरिट डिश - विराट कोहलीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा