Advertisement

बटर चिकन, मुघलई चिकन माझी फेव्हरिट डिश - विराट कोहली


बटर चिकन, मुघलई चिकन माझी फेव्हरिट डिश - विराट कोहली
SHARES

गेल्या सहा-सात वर्षांपासून विराट कोहलीनं फिटनेस जपण्यासाठी चपाती, मटण, चिकनला हातसुद्धा लावला नाही, अशी चर्चा अाहे. अातापर्यंत जेवणात फक्त सलाड, फळं, उकडलेल्या भाज्या अाणि ब्रेड याला प्राधान्य देणाऱ्या विराट कोहलीच्या फेव्हरिट डिशेस मात्र अापल्यासारख्याच अाहेत. मुघलई चिकन अाणि बटर चिकन ही माझी फेव्हरिट डिश असल्याचं खुद्द विराट कोहलीनं कबूल केलंय. त्याचबरोबर जापनीस फूड म्हणजे विराटचा जीव की प्राण. दिवसात कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी माझ्यासमोर जापनीस फूड अालं तरी त्यावर यथेच्छ ताव मारतो, हेही विराटनं कबूल केलंय.


विश्रांतीची फार गरज होती

गेल्या अनेक महिन्यांपासून मी सतत क्रिकेट खेळत अाहे. एखाद्या सामन्यात मी खेळलो नसेन, असे फारच अभावाने घडले असेल. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी विश्रांतीची नितांत अावश्यकता होती. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याच्या बाबतीत मी फारच सजग अाहे. अाता मिळालेल्या विश्रांतीची मी मजा लुटत असून अागामी अायपीएलसाठी शारीरिक अाणि मानसिकदृष्ट्या फिट होऊन मी मैदानात उतरणार अाहे, असे विराट कोहलीने फिनिक्स मिलमध्ये रंगलेल्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.


चहलला घड्याळ देण्याची इच्छा

सरावाला येताना लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा नेहमीच उशिरा येत असतो. त्यामुळे चहलला वेळेवर येण्यासाठी एक घड्याळ देण्याची माझी इच्छा अाहे, असे टिसो या घड्याळ ब्रँडच्या कार्यक्रमात विराटने सांगितले. राॅजर फेडरर हा माझा अादर्श अाहे. कारकीर्दीचा अस्त होत असताना अनेक टीकाटिपण्णीला सामोरे गेलेल्या फेडररने ३६व्या वर्षीही जोमाने कमबॅक करून ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली होती. त्याच्याविषयी माझ्या मनात कमालीचा अादर अाहे, असेही विराटने सांगितले.


हेही वाचा -

विराट कोहलीला संधी देऊन मी नोकरी गमावली - दिलीप वेंगसरकर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा