• असं रंगलं विराट आणि अनुष्काचं रिसेप्शन
SHARE

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचं रिसेप्शन मंगळावारी मुंबईत झालं. लोअर परेल इथल्या द सेंट रेगिस हॉटेलमध्ये विराट आणि अनुष्काचं रिसेप्शन थाटात पार पडलं. या हॉटेलमध्ये 395 खोल्या आहेत. यामध्ये 27 सूट्स आणि 39 रेसिडेन्शियल सूट्स आहेत. या सूट्समधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.रिसेप्शन सोहळ्यात अनुष्कानं स्लीवलेस चोळी आणि लहंगा परिधान केला होता. तिनं सुंदर असा एक नेकलेस देखील घातला होता. विराटनं क्रिम कलरच्या ट्राउजरवर नेव्ही ब्लू कोट घातला होता. या पोशाखात दोघेही खुलून दिसत होते.

रिसेप्शनला दिग्गजांची हजेरी

बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते खेळ विश्वातील खेळाडूंपर्यंत सर्वांनी या रिसेप्शनला हजेरी लावली होती. भारतीय क्रिकेट संघातील रविंद्र अश्विन, चेतेश्वर पूजारा, उमेश यादव, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, सचिन तेंडुलकर, युवराज सिंह आणि हरभजन सिंग माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, वीरेंद्र सहवाग, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, माजी क्रिकेपटू संदीप पाटील यांच्यासोबतच अनेकांनी रिसेप्शनला हजेरी लावली. रिसेप्शनमध्ये महेंद्र सिंग धोनी आपल्या चिमुकल्या मुलीसोबत दिसला. याशिवाय न्यू कपल झहीर खान आणि सागरिका देखील हजर होते.शाहरुख खाननं लावले चारचाँद

बिग बींनी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत रिसेप्शनला हजेरी लावली. यासोबतच रेखा, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, ए. आर. रेहमान, वरुण धवन असे अनेक सेलिब्रिटी हजर होते.


 

रणवीर कपूरनं देखील रिसेप्शनला हजेरी लावली. यासोबतच कतरिना कैफ देखील रिसेप्शनला हजर होती. कतरिना आपल्या बहिणीसोबत रिसेप्शनला आली होती. तर रणवीर आपल्या आईसोबत आला होता. 
किंगखाननं या रिसेप्शनमध्ये चारचाँद लावले. 'जब तक है जान' या चित्रपटातील फेमस डायलॉग विराटनं शाहरुखच्या मदतीनं अनुष्कासाठी बोलण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शाहरुखनं अनुष्का आणि विराटसोबत 'छंया छंया' गाण्यावर थिरकला देखील.
रिसेप्शनला फक्त दिग्गजच नव्हे तर विरुष्काचे चाहते देखील हजर होते. त्या चाहत्यांपैकी एकासोबत अनुष्कानं फोटो काढला. रिसेप्शननंतर अनुष्का विराट कोहलीसोबत साऊथ आफ्रिकेला जाणार आहे. विराट आणि अनुष्का नव्या वर्षाचे सेलिब्रेशन दक्षिण आफ्रिकेत करणार आहे. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विरुष्का मुंबईत परतण्याची शक्यता आहे.  


संबंधित विषय
ताज्या बातम्या