पी. टी. उषाची भूमिका साकारणार कतरिना?

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची क्रेझच आली आहे असं म्हणावं लागेल. मेरी कोम, संजू, दंगल, नीरजा, मांझी, भाग मिल्खा भाग या बायोपिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. भारताच्या प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. या चित्रपटात पी. टी. उषा यांच्या भूमिकेसाठी कतरिना कैफच्या नावाची चर्चा आहे.

बॉक्सर मेरी कोम यांची व्यक्तीरेखा साकारणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिला पी. टी. उषा यांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण तिनं प्रतिसाद न दिल्यानं कतरिनाला विचारण्यात आलं. कतरिनानं देखील अद्याप या भूमिकेसाठी होकार दिलेला नाही. सध्या कतरिना सलमान खानच्या भारतमध्ये झळकणार आहे. या चित्रपटानंतर तिच्याकडे सुर्यवंशी हा चित्रपट आहे. यात ती अक्षय कुमारसोबत झळकणार आहे.

२०१७ पासून पी. टी. उषा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र काही कारणास्तव बायोपिक बनवण्यात अडथळे येत होते. पण आता बायोपिकचा मार्ग मोकळा झाला आहे. हा बायोपिक इंग्लिश, हिंदी, चीनी, रशियन आणि अन्य भाषांत प्रदर्शित करण्याचा विचार आहे. दिग्दर्शक रेवती वर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. याआधी रेवती यांनी तामिळ आणि मल्याळम भाषेतील काही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.


हेही वाचा

'अंग्रेजी मिडियम'मध्ये इरफानसोबत झळकणार करिना

अमिताभ प्रथमच तृतीयपंथीयाच्या भूमिकेत!

पुढील बातमी
इतर बातम्या