'अंग्रेजी मिडियम'मध्ये इरफानसोबत झळकणार करिना

गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढा देत असलेल्या इरफान खानच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा होताच 'अंग्रेजी मिडियम' चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

SHARE

रेहा कपूर यांच्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटानंतर अभिनेत्री करिना कपूर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात करिनाच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं. चित्रपटातील या यशानंतर करिना एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. 'हिंदी मिडियम'चा सीक्वेल असलेल्या 'अंग्रेजी मिडियम' या चित्रपटात करीना कपूरची वर्णी लागली आहे.


कर्करोगाशी लढा

'अंग्रेजी मिडियम' चित्रपटात इरफान खानसोबत करिना कपूर झळकणार आहे. गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढा देत असलेल्या इरफान खानच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा होताच 'अंग्रेजी मिडियम' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात इरफान खान यांची भूमिका निश्चितच होती. पण इरफान खानसोबत कुठल्या अभिनेत्रीची वर्णी लागणार हे मात्र निश्चित नव्हतं. अखेर या भूमिकेसाठी करिना कपूरची निवड करण्यात आली.


पहिला लूक प्रदर्शित

'अंग्रेजी मिडियम' चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अडजानिया करणार असून चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करणार आहेत. याआधी चित्रपटातील इरफानचा पहिला लूक प्रदर्शित झाला होता. या फोटोत इरफान एका मिठाईच्या दुकानाबाहेर उभा राहिलेला दिसत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे. जूनमध्ये उर्वरीत शूटिंग लंडनला होणार आहे.हेही वाचा -

पहिल्याच दिवशी 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' ची ११८५ कोटींची कमाई

गोविंदाच्या 'कुली नंबर १' चा रिमेक, 'या' कलाकारांची लागली वर्णी  
संबंधित विषय
ताज्या बातम्या