Advertisement

पहिल्याच दिवशी 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' ची ११८५ कोटींची कमाई


पहिल्याच दिवशी 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' ची ११८५ कोटींची कमाई
SHARES

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट अखेर शुक्रवारी जगभरात प्रदर्शित झाला. अ‍ॅव्हेंजर्स इनफिनिटी वॉर या चित्रपटानंतर त्याच्या पुढच्या भागाची म्हणजेच अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली. चित्रपटानं शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी केलेली कमाई ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. पहिल्याच दिवशी चित्रपटानं ११८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.


२१ चित्रपट 

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या अ‍ॅव्हेंजर्स सिरीजमध्ये सर्वात जास्त चर्चा 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ची झाली. 'अ‍ॅव्हेंजर्स इन्फिटी वॉर'चा हा दुसरा भाग आहे. चित्रपटाची संकल्पना २००८ साली मार्व्हलचे प्रणेते स्टॅन ली यांनी मांडली. पुढे एक एक करत २१ चित्रपट आले. अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरमध्ये थेनॉस चुटकिनीशी अर्ध्याहून अधिक मानवजातीचा विनाश करतो. यामध्ये २१ चित्रपटातील काही अ‍ॅव्हेंजर्स हिरोंचा देखील समावेश असतो. पण अ‍ॅव्हेंजर्स एंडगेममध्ये कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक व्हिडो, रॉकेट, नेब्यूला हे सुपरहिरो पुन्हा एकदा थेनॉसवर हल्ला करताना दिसत आहेत. थ्रीडी अनिमेशन, उत्तम मॉडेल निर्मिती, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सिनेमेटोग्राफी यामुळेच प्रेक्षकांची चित्रपटाला अधिक पसंती मिळत आहे.



हेही वाचा -

तीन खानांच्या भेटीमागील रहस्य काय?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा