गोविंदाच्या 'कुली नंबर १' चा रिमेक, 'या' कलाकारांची लागली वर्णी

१९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली नंबर १’मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर लीड रोलमध्ये होते. त्यांच्याशिवाय कादर खान, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर या दिग्गज अभिनेत्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

SHARE

‘कलंक’ चित्रपटानंतर वरुण धवन सध्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटात व्यस्त आहे. पण या चित्रपटानंतर वरुण एक धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. एका सुपर डुपर हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट आहे कुली नंबर १.

 

सारा खानची एन्ट्री 

वरूणचे वडिल डेव्हिड धवन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. आता या रिमेकमध्ये सारा अली खानची एन्ट्री झालीय. संवाद लेखक फरहाद सामजी यांनी या वृत्ताला दुजोरा दिली आहे. ‘वरूणसारख्या अभिनेत्यासोबत काम करणे कुठल्याही लेखकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी नुकतेच त्याला संवाद ऐकवले आणि त्यानं लगेच रिहर्सलसाठी या संवादाची एक कॉपी मागवून घेतली. ‘कुली नंबर १’ सुरु व्हायला वेळ आहे. पण वरूण त्यासाठी रिहर्सल करू इच्छितो. मी सारासोबत दुसऱ्यांदा काम करण्यासही उत्सुक आहे,’ असं फरहाद यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.


या आधी जुडवाचा रिमेक

१९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली नंबर १’मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर लीड रोलमध्ये होते. त्यांच्याशिवाय कादर खान, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर या दिग्गज अभिनेत्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘कुली नंबर १’च्या रिमेकपूर्वी डेव्हिड धवन यांनी १९९७ मध्ये प्रदर्शित ‘जुडवा’चा रिमेक बनवला होता. यात वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होते. ‘जुडवा २’आधी वरूणने पापा डेव्हिड धवनच्या ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटात काम केले आहे.हेही वाचा -

कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीर नाही 'हा' कलाकार होता पहिली पसंती

श्रद्धा कर्जतमध्ये करतेय 'साहो'चं शूटिंग
संबंधित विषय
ताज्या बातम्या