कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीर नाही 'हा' कलाकार होता पहिली पसंती


SHARE

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या करियरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. एकामागून एक हिट चित्रपट दिल्यानंतर रणविर सध्या १९८३ साली भारतानं जिंकलेल्या वर्ल्ड कप वरील आधारीत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. '83' असं या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटासाठी रणवीर कपिल देव यांच्याकडून ट्रेनिंग घेत आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कपिल देव यांच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत रणवीर सिंह नव्हता.


यामुळे रणवीरला पसंती

कपिल देव यांच्या भूमिकेसाठी सर्वात पहिली पसंती रणदीप हुडाला देण्यात आली होती. रणदीप हुडाला या संदर्भातील प्रस्ताव देखील देण्यात आला होता. याची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली होती. पण रणदीप हुडासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरन सिंह करणार होते. पण काही कारणास्तव या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सर्व सूत्रं कबीर खान यांच्या हाती गेली. दिग्दर्शनाची सूत्रं  हाती येताच कबीर खान यांनी रणवीर सिंहला पसंती देत त्याच्यासोबत चित्रपट साईन केला. अशाप्रकारे कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाच्या जागी रणवीर सिंगची वर्णी लागली.हेही वाचा

क्रिकेटर रणवीर सिंगचा हा व्हिडीओ पाहिला का?

मधुरची नजर 'बॉलिवूड वाइव्स'वर!
संबंधित विषय
ताज्या बातम्या