
होळी आणि शिमग्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात प्रवास करतात. यासाठी मध्य रेल्वेने कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 गाड्या (special train) सुरु करणार आहेत.
यापैकी 94 ट्रेन होळीसाठी विशेष असतील आणि 94 नियमित विशेष ट्रेन असतील.
मुंबई (mumbai)-नागपूर, सावंतवाडी रोड, पुणे-नागपूर या मार्गांवर या विशेष गाड्या धावतील. शिवाय बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूरसाठीही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वेचे (konkan railway) जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई -सावंतवाडी रोड दरम्यान फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ठराविक तारखांवर विशेष गाड्या धावणार आहेत.
आठवड्यातून दोनदा या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामुळे ट्रेनचं वेळापत्रक पाहून 18 फेब्रुवारी पासून तिकिट बुक करण्याचं अवाहान प्रवाशांना केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन (csmt) 26 फेब्रुवारीरोजी ट्रेन क्रमांक 01171 मध्यरात्री 12.20 वाजता सुटणार आहे. ही गाडी त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता सावांतवाडी रोड वर पोहचणार आहे.
यानंतर याच मार्गावर पुन्हा 5 मार्चलाही सीएसएमटी -सावंतवाडी रोडदरम्यान ही ट्रेन धावणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 01172 सावंतवाडी रोड स्थानकावरून 5.20 ला त्याच दिवशी निघणार आहे. ही ट्रेन दसऱ्य दिवशी पहाटे 3.45 ला पोहचणार आहे.
सीएसएमटी- सावंतवाडीदरम्यान या गाड्यांना दादर, ठाणे (thane), पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ असे थांबे दिले असणार आहेत.
या ट्रेनमध्ये 22 डबे असून यामध्ये एसी, स्लीपर, जनरल आणि स्लीपर कोच असणार आहेत.
याशिवाय, ट्रेन क्रमांक 01119 ही लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड दरम्यान ट्रेनसुद्धा 26 फेब्रुवारीला आणि 5 मार्चला धावणार आहेत.
LTT स्थानकावरून रात्री 10.15 ला ही ट्रेन सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 ला सावंतवाडी रोडवर पोहचणार आहे.
परतीसाठी ट्रेन क्रमांक 01120 सावंतवाडी रोडवरून 27 फेब्रुवारी आणि 6 मार्चला सायंकाळी 5.20 ला सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी एलटीटी स्थानकावर ही ट्रेन पहाटे 4.05 ला पोहचणार आहे.
याशिवाय CSMT- नागपूरदरम्यान आठवड्यातून दोन वेळा विशेष ट्रेन सोडणार आहे. सीएसएमटी-गोरखपूरसाठी एक दैनंदिन ट्रेन असणार आहे.
तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारससाठी विशेष गाडी, तसेच समस्तीपूर व दानापूर मार्गावरही गाडी सोडण्यात येणार आहे.
नागपूर, पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर, पुणे-गाझीपूर सिटी आणि पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गावरही होळीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सुरु केल्या जाणार आहेत.
हेही वाचा
