Advertisement

क्रिकेटर रणवीर सिंगचा हा व्हिडीओ पाहिला का?

'गल्ली बाॅय' या चित्रपटात स्ट्रीट रॅपरची यशस्वी भूमिका साकारल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग सध्या क्रिकेटपटू बनण्याची ट्रेनिंग घेण्यात बिझी आहे. रणवीरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याच्यासह बरेच कलाकार क्रिकेटचं प्रशिक्षण घेत असल्याचं पाहायला मिळतं.

क्रिकेटर रणवीर सिंगचा हा व्हिडीओ पाहिला का?
SHARES

'गल्ली बाॅय' या चित्रपटात स्ट्रीट रॅपरची यशस्वी भूमिका साकारल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग सध्या क्रिकेटपटू बनण्याची ट्रेनिंग घेण्यात बिझी आहे. रणवीरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याच्यासह बरेच कलाकार क्रिकेटचं प्रशिक्षण घेत असल्याचं पाहायला मिळतं.


कलाकारांना क्रिकेटचे धडे

२००३ मध्ये उभारण्यात आलेलं धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम सध्या क्रिकेटच्या एका अनोख्या पर्वाचं मूक साक्षीदार बनलं आहे. एरव्ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीनं दुमदुमणारं हे स्टेडियम सध्या कलाकारांना क्रिकेटचे धडे देत असल्याचं पहात आहे. रणवीरनं हाच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला आहे.


पराक्रमाची सुवर्ण गाथा

कबीर खान दिग्दर्शित '८३' या आगामी हिंदी चित्रपटासाठी कलाकारांना क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचं काम सध्या धर्मशालामध्ये सुरू आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरून गाजवलेल्या पराक्रमाची सुवर्ण गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यासाठी रणवीरसोबतच चित्रपटातील सर्व कलाकार सध्या कसून मेहनत करत आहेत.


कलाकारांना प्रशिक्षण

रणवीरनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, बलविंदर सिंग संधू, मदन लाल आदी भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज क्रिकेटपटू कलाकारांना प्रशिक्षण देत असल्याचं पाहायला मिळतं. आपली भूमिका पडद्यावर साकारणाऱ्या कलाकाराला प्रत्येकजण आपापली शैली शिकवत आहे. या चित्रपटात कपिल यांची भूमिका रणवीर साकारत असल्यानं ते रणवीरला आपली बॅालिंग आणि बॅटिग अॅक्शन शिकवत आहेत. 



'कम आॅन बॅाइज'

'वन इयर फ्रॅाम नाऊ, रिलीव्ह इंडीयाज ग्रेटेस्ट स्टोरी' असं उत्साहवर्धक वाक्यही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं, जे '८३' या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक वाढवतं. या व्हिडीओत फलंदाजी, गोलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणाचाही सराव करवून घेतला जात आहे. यात अखेरीस 'कम आॅन बॅाइज' असं सर्व कलाकार ओरडतात आणि गुड फ्रायडे १० एप्रिल २०२० ही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख येते.



हेही वाचा -

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर मुंबईच्या सुरक्षेत वाढ

१२० कोटी द्या, नाहीतर वानखेडे स्टेडिअमचा ताबा सोडा, राज्य सरकारचा 'एसीएला' इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा