Advertisement

१२० कोटी द्या, नाहीतर वानखेडे स्टेडिअमचा ताबा सोडा, राज्य सरकारचा 'एसीएला' इशारा

वानखेडे स्टेडिअमचा वापर सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारनं स्टेडिअम प्रशासनाकडे १२० कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

१२० कोटी द्या, नाहीतर वानखेडे स्टेडिअमचा ताबा सोडा, राज्य सरकारचा 'एसीएला' इशारा
SHARES

वानखेडे स्टेडिअमचा वापर सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडे १२० कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी एमसीएला  नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. राज्य सरकार आणि एमसीएलामधील करार संपुष्टात आल्यामुळं ही नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रशासनाने वेळेत पैसे न भरल्यास पुढील आयपीएलच्या सामन्यांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे. 


१२० कोटींची मागणी 

थकीत कर, वानखेडे स्टेडिअमचं करार नूतनीकरण आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनला १६ एप्रिल रोजी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवली आहे. या नोटीशीत १२० कोटी रूपयांचा भरणा करण्यास सांगण्यात आलं असून ही रक्कम न भरल्यास एमसीएला हे स्टेडिअम रिकामं कराव लागणार आहे. तसंच यासाठी ३ मे ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.


५० वर्षांचा करार

१९७५ साली एस. के. वानखेडे यांनी या वानखेडे स्टेडिअमची उभारणी केली होती. यानंतर त्यांचा क्रिकेट क्लब ऑफ इंडायसोबतही वाद झाला होता. तसंच स्टेडिअमच्या उभारणीसाठी देण्यात आलेली जागा ही ५० वर्षांच्या कारारावर देण्यात आली होती. परंतु गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा करार संपुष्टात आला होता. या ठिकाणी सध्या बीसीसीआयचं मुख्यालयाही असून स्टेडिअमला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये थकीत रक्कम लवकरात लवकर भरण्यास सांगितलं आहे. 


मुख्यमंत्र्यांकडं प्रस्ताव

कराराच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडं प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती एमसीकडून देण्यात आली. तसंच बाजारभावानुसार भाडं देण्यात येणार असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. आपल्याला पाठवण्यात आलेल्या नोटीस बद्दल कल्पना असल्याची माहितीही एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. नाईक यांनी दिली.




हेही वाचा -

१ जूनला सुरू होणार एसटीचं जेनेरिक औषधालय



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा