श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर मुंबईच्या सुरक्षेत वाढ

रविवारी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह देशातील अनेक शहरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान, सतर्क राहण्याच्या दृष्टीने सर्व शहरांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर मुंबईच्या सुरक्षेत वाढ
SHARES

रविवारी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह देशातील अनेक शहरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सतर्क राहण्याच्या दृष्टीने सर्व शहरांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली असून महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.


सीसीटीव्हीची मदत

सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासोबतच पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यातच देशभरात सध्या लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वातावरण असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


सोशल मीडियावर नजर

गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातीव पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त बॉम्ब शोध पथक, दहशतवाद विरोधी पथक आणि गुन्हे शाखा यांचीदेखील मदत घेण्यात येत आहे. तर व्हॉट्सअप आणि अन्य सोशल मीडियावरही पोलिसांचं एक पथक नजर ठेऊन आहे. 



हेही वाचा -

बेनामी ६ कोटी रुपयांना अद्याप वाली नाही

चित्रपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली निर्मात्याला सव्वा कोटीचा गंडा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा