Advertisement

श्रद्धा कर्जतमध्ये करतेय 'साहो'चं शूटिंग

'साहो'सारख्या बिग बजेट चित्रपटात प्रभाससोबत काम करणं ही श्रद्धासाठी खूप मोठी संधी मानली जात आहे. श्रद्धानं नुकतंच 'स्ट्रीट डांसर' या चित्रपटाचं लंडनमधील शूटिंग शेड्युल पूर्ण केलं असून, लवकरच दुसऱ्या शेड्युललाही सुरुवात करणार आहे.

श्रद्धा कर्जतमध्ये करतेय 'साहो'चं शूटिंग
SHARES

'आशिकी २' आणि 'एक व्हिलन' हे चित्रपट बॅाक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यापासून श्रद्धा कपूर आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात भलतीच बिझी झाली आहे. सध्या ती कर्जतमध्ये बहुचर्चित 'साहो'चं चित्रीकरण करत आहे.


श्रद्धाची धावपळ 

मागील काही दिवसांपासून 'स्ट्रीट डांसर' आणि 'छीछोरे' या चित्रपटांसाठी एका सेटवरून दुसऱ्या सेटवर पोहोचण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात श्रद्धाची धावपळ सुरू होती. या दोन चित्रपटांना दिलेल्या तारखांनुसार शूट पूर्ण केल्यानंतर श्रद्धा आता अभिनेता प्रभाससोबतच्या 'साहो' या बिग बजेट चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करत आहे. याचं शूट सध्या मुंबई जवळील कर्जतमध्ये सुरू आहे. श्रद्धानं स्वत:च आपला एक व्हिडीओ शेअर करत 'कर्जत टाईम! साहो', असं लिहिलं आहे. श्रद्धानं शिलोह नावाच्या पाळीव कुत्र्यासोबतचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना 'साहो'चं शूट कर्जतमध्ये करत असल्याची गुड न्यूज दिली आहे. 


बिग बजेट

'साहो'सारख्या बिग बजेट चित्रपटात प्रभाससोबत काम करणं ही श्रद्धासाठी खूप मोठी संधी मानली जात आहे. श्रद्धानं नुकतंच 'स्ट्रीट डांसर' या चित्रपटाचं लंडनमधील शूटिंग शेड्युल पूर्ण केलं असून, लवकरच दुसऱ्या शेड्युललाही सुरुवात करणार आहे. एकाच वेळी विविध विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना प्रत्येक चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेचं अचूक बेअरिंग पकडणं आणि त्याला न्याय देणं हे श्रद्धासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. 


पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

'साहो'मध्ये ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या अॅक्शनपॅक भूमिकेत आहे, तर 'छीछोरे'मध्ये कॅालेज तरुणी आणि मध्यमवयीन स्त्रीच्या दुहरेही भूमिकेत दिसेल. 'स्ट्रीट डांसर'मध्ये चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच श्रद्धाचं डांसिंग रूप पहायला मिळेल. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे, पण यंदा प्रदर्शित होणाऱ्या 'बागी ३'मध्ये तिचा बागी अवतारही पहायला मिळेल. असं असलं तरी तूर्तास तरी श्रद्धानं 'साहो'तील आपल्या व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित केलं आहे.हेही वाचा  -

जॅान-अर्शदचा 'पागलपंती'

कतरिनानेच मारली बाजी; पुन्हा बनली अक्षयची नायिका
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा