Advertisement

जॅान-अर्शदचा 'पागलपंती'

मागील काही दिवसांपासून जॅान लंडन मुक्कामी होता. तिथे तो 'पागलपंती' या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी होता. या चित्रपटात त्याच्या जोडीला 'मुन्नाभाई'मधील सर्किट म्हणजेच अर्शद वारसी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

जॅान-अर्शदचा 'पागलपंती'
SHARES

पूर्वी बऱ्याचदा मल्टिस्टारर चित्रपटांमध्ये दिसणारा अभिनेता जॅान अब्राहम मागील काही वर्षांपासून सोलो हिरो चित्रपटांमध्ये बाजी मारत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'रॅा' या चित्रपटाला बॅाक्स आॅफिसवर चांगला रिस्पॅान्स मिळाला नसला तरी जॅानची 'पागलपंती' मात्र सुरूच आहे.


जॅान-अर्शदची केमिस्ट्री 

होय, मागील काही दिवसांपासून जॅान लंडन मुक्कामी होता. तिथे तो 'पागलपंती' या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी होता. या चित्रपटात त्याच्या जोडीला 'मुन्नाभाई'मधील सर्किट म्हणजेच अर्शद वारसी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 'मुन्नाभाई'मध्ये अर्शदची संजय दत्तसोबतची केमिस्ट्री तुफान हिट झाली होती. त्यामुळं या चित्रपटात जॅान-अर्शदची केमिस्ट्री पाहताना मजा येणार आहे. 


शूटिंग लंडनमध्ये

मॅड कॅामेडीपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक अनीस बाज्मी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचं मुख्य शूटिंग शेड्युल लंडनमध्ये नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे. बाज्मींचा हा आणखी एक कॅामेडी चित्रपट आहे. या चित्रपटात जॅान-अर्शदच्या जोडीला अनिल कपूर, इलियाना डिक्रूझ, पुलकित सम्राट, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका पेक्षा एक दमदार कलाकार आहेत.


२२ नोव्हेंबरला प्रदर्शित

या चित्रपटाच्या सेटवरील पुलकित, अर्शद, निर्माते कुमार मंगत पाठक, अनीस आणि जॅान यांचा फोटो चित्रपटातील धमाल मूड दर्शवणारा आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांच्या टी-सिरीज तसंच कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांच्या पॅनोरमा स्टुडिओज अंतर्गत केली जात आहे. आदित्य चौक्सी आणि संजीव जोशी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.हेही वाचा -

क्रिकेटर रणवीर सिंगचा हा व्हिडीओ पाहिला का?

कतरिनानेच मारली बाजी; पुन्हा बनली अक्षयची नायिका
संबंधित विषय
Advertisement