विराट-अनुष्कानं दिली गुड न्यूज

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहलं आहे की, And Then, we were three! जानेवारी २०२१ ला नव्या पाहुण्याचे आगमन होणार.

विराट आणि अनुष्का यांचा विवाह डिसेंबर ११, २०१७ रोजी इटलीमध्ये झाला. मोजक्या लोकांसह विराट-अनुष्का लग्नबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये विराट-अनुष्काची जोडी विरुष्का म्हणून प्रसिद्ध आहे. विराट सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएइला आला असून अनुष्का मुंबईत आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विराट-अनुष्का एकत्र मुंबईतील त्यांच्या घरी होते. याकाळात दोघांनी क्वालिटी टाइम घालवला. याचे फोटो आणि व्हिडीओ विराट-अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असतं. विराट आणि अनुष्कानं दिलेले हे सरप्राइज चाहत्यांसाठी नक्कीच खास आहे.


हेही वाचा

६५ वर्षांवरील कलाकार आणि क्रू सदस्यांना शूटिंगची परवानगी

करीना कपूर खान दुसऱ्यांदा होणार आई, सैफनं दिली गूड न्यूज

पुढील बातमी
इतर बातम्या