Advertisement

करीना कपूर खान दुसऱ्यांदा होणार आई, सैफनं दिली गूड न्यूज

करीना कपूर खान पुन्हा गरोदर असल्याची बातमी खुद्द सैफ आली खाननं दिली.

करीना कपूर खान दुसऱ्यांदा होणार आई, सैफनं दिली गूड न्यूज
SHARES

सैफ अली खान (saif ali khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor Khan) या सेलेब्रिटी जोडीनं पुन्हा एकदा गोड न्यूज दिली आहे. करीना कपूर खान पुन्हा गरोदर असल्याची बातमी खुद्द सैफ आली खाननं दिली.

आमच्या कुटुंबात नवा पाहुणा येणार आहे, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होतो आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार, असा संदेश सैफ आणि करीनाने जाहीर केला आहे.

हेही वाचा : संजय दत्तच्या आजाराबद्दल पत्नी मान्यताचं निवेदन, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

तैमूर अली खाननंतर (Taimur ali khan)आता आपण आणखी एका पाहुण्याला कुटुंबात स्थान देण्यासाठी उत्सुक असल्याचं सैफ आणि करीनानं जाहीर केलं आहे. गेले कित्येक दिवस बॉलिवूडमध्ये करिना पुन्हा आई होणार असल्याची (Second baby) चर्चा सुरू होती. सैफ आणि करीनानं आता नव्या पाहुण्याच्या आगमानाची चाहूल असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.

सैफ अली खान आणि करिना यांचा मुलगा तैमूर अली खान याच्या जन्मानंतर काही दिवस करिनानं चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचं धडाक्यात पुनरागमनही झालं. आपण पुन्हा एकदा आई व्हायचा निर्णय घेऊ शकतो, असं ती काही मुलाखतींमधून सांगत होती. आता सैफ आणि करीनानं दुसऱ्यांदा ही गोड बातमी शेअर केली आहे.

करीना कपूर दुसऱ्यांना गरोदर असल्याच्या बातम्या काही बॉलिवूड इनलायडर्सच्या हवाल्याने दिल्या जात होत्या. पण त्याला अधिकृतरीत्या पुष्टी अखेर मिळाली. स्वतः सैफ आणि करीनानंच ही गोड बातमी शेअर केली आहे.हेही वाचा

'सडक २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, संजय, आलिया आणि सिद्धार्थचा ट्रिपल धमाका

...म्हणून संजय दत्त अभिनीत 'सडक 2' चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध

संबंधित विषय
Advertisement