Advertisement

...म्हणून संजय दत्त अभिनीत 'सडक 2' चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध

विश्व हिंदू परिषदेनं चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर हिंदूविरोधी चित्रपट बनवल्याचा आरोप केला आहे.

...म्हणून संजय दत्त अभिनीत 'सडक 2' चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध
SHARES

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. लवकरच तो उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहे. दरम्यान त्याच्या आगामी ‘सडक 2’ या चित्रपटाचा ट्रेलरही समोर आला आहे. पण आता या चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेनं विरोध केला आहे.

संजय दत्त याच्या सडक 2 ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबला प्रदर्शित होताच त्यांला चांगले व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. पण आता विश्व हिंदू परिषदेनं चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर हिंदूविरोधी चित्रपट बनवल्याचा आरोप केला आहे.

चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावणारी काही दृश्यं दाखवली असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजयशंकर तिवारी यांनी लिहिलं होतं की, “महेश भट्ट दिग्दर्शित फिल्म सडक पुन्हा एकदा हिंदूंच्या भावनांचा अपमान करत आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर दाखवला जाईल, चित्रपट केवळ नेपोटिजमचा भडीमार आहे. ते महेश भट्ट पुढे नेत आहेत. केंद्र सरकारनं यावर कारवाई केली पाहिजे."

दुसरं ट्विट करत ते म्हणाले की, संजय दत्त हा सुनील दत्त यांचा मुलगा आहे. तर पूजा आणि आलिया महेश भट्टच्या मुली आहेत. आदित्य कपूर सिद्धार्थ रॉयचा भाऊ आहे. या सगळ्यांचा चित्रपट आहे सडक २, ज्याचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. महेश भट्टला हे सांगण आवश्यक आहे की तुझा आणि तुझ्या चित्रपटाची अवस्था खान ब्रदर्स सारखी होईल. यालाच नेपोटिझम म्हणतात."

महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. २८ ऑगस्टला चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा

संजय दत्तच्या आजाराबद्दल पत्नी मान्यताचं निवेदन, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement