Advertisement

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकितानं सोडलं मौन, नैराश्यासंदर्भात केला मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर पहिल्यांदाच अंकिता लोखंडेनं व्यक्तव्य केलं आहे. सुशांतच्या नैराश्या संदर्भात तिनं केला मोठा खुलासा...

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकितानं सोडलं मौन, नैराश्यासंदर्भात केला मोठा खुलासा
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आता त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं सुशांतसंबंधी अनेक गोष्टींसंदर्भात खुलासे केले. या मुलाखतीत अंकितानं सांगितलं की, सुशांतसाठी पैसा कधीही महत्त्वाचा नव्हता. जर सर्वकाही संपले तरीदेखील पुन्हा एकदा साम्राज्य उभं करेल, असं तो कायम म्हणायचा, असं अंकितानं सांगितलं.

अंकिता म्हणाली की, "सुशांतसाठी पैसा ही खूप लहान गोष्ट होती. परंतु त्याचे पॅशन खूप मोठे होते. त्याची सर्जनशीलता, चित्रपटांबद्दलची त्याची आवड खूप मोठी होती. तो प्रत्येक गोष्ट मोठ्या जोमानं करायचा. मी त्याला पाहिलं आहे, तो आनंदानं नाचत असे. श्यामक दावर यांच्या ग्रुप बॅकग्राऊंडमध्ये तो डान्सर होता. त्याचा प्रवास इथून सुरू झाला आणि ‘दिल बेचार’ या चित्रपटापर्यंत येऊन संपला'', असं अंकिता म्हणाली.

हेही वाचा : मराठीतील पहिला झोंबिवर आधारीत चित्रपट, झोंबिवलीचा फर्स्ट लूक आला समोर

अंकिता पुढे म्हणाली, ''सुशांतला डायरी लिहिण्याची सवय होती. तो या डायरीमध्ये त्याच्या पुढच्या पाच वर्षांचं प्लॅन लिहून ठेवत असे. सुशांतला सर्वजण नैराश्यामध्ये असलेल्या मुलापेक्षा एक हिरो म्हणून कायम लक्षात ठेवतील. तो एक साधा मुलगा होता. छोट्या गावातून आलेला. त्यानं इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावले होते. आतापर्यंत मी त्याला जितके ओळखते त्यावरून इतकं सांगू शकते की, तो डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हता. त्याच्या विषयी बायपोलर किंवा नैराश्यात असलेला मुलगा हे शब्द वापरणं चुकीचं ठरेल.''

दुसरीकडे, सुशांतच्या कोटक महिंद्रा, एचडीएफसी आणि एक्सिस बँकेच्या खात्यातून रियाची कंपनी विविड्रेज रियालिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तीन व्यवहार झाले आहेत. त्यामुळे सुशांतच्या वडिलांनी रियावर पैसे उकळल्याचा आरोपही केला आहे.

पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात त्यांनी सांगितले की, "माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटवरुन गेल्या एका वर्षात त्यातून सुमारे १५ कोटी रुपये काढले गेल्याचं मला समजलं आहे. ज्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर झाले त्या ठिकाणी माझ्या मुलाचा काही संबंध नव्हता. रियानं आपल्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसह मिळून माझ्या मुलाच्या बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डातून किती पैसे काढले? याची सखोल चौकशी व्हावी', असं ते म्हणाले आहेत.हेही वाचा

सुशांतवर आधारीत चित्रपटातील विलनचा लूक समोर, नेटिझन्सनी केली करणशी तुलना

ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत, कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement