Advertisement

सुशांतवर आधारीत चित्रपटातील विलनचा लूक समोर, नेटिझन्सनी केली करणशी तुलना

राणाचा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स त्याची तुलना चित्रपट निर्माता करण जोहरशी करत आहेत.

सुशांतवर आधारीत चित्रपटातील विलनचा लूक समोर, नेटिझन्सनी केली करणशी तुलना
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपट निर्माता करण जोहरला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण काही दिवसांपासून हे प्रकरण थोडं थंड पडलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा करण जोहरला ट्रोल करण्यात येत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या डेथ मिस्ट्रीवर आधारित 'सुसाइड ऑर मर्डर: ए स्टार वॉज लॉस्ट' या चित्रपटातील खलनायकाचा पहिला लूक समोर आला आहे. मॉडेल राणानं या चित्रपटात चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेला नेपोकिंग असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे राणाचा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स त्याची तुलना चित्रपट निर्माता करण जोहरशी करत आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म व्हीएसजी बिंज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पोस्टर शेअर केले आहे. ‘तो एक मोठा चित्रपट निर्माता आहे. पण तो फक्त स्टार किड्सला लाँच करतो. मॉडेल राणा नेपोकिंगची चित्रपटात भूमिका साकारणार आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे.

राणाचा चित्रपटातील फर्स्ट लूक बघून नेटकऱ्यांनी त्याची तुलना करण जोहरशी केली आहे. एका नेटक-यानं लिहिलं आहे की, "म्हणजे तो करण जोहरच असेल?". "मला वाटते की हा करण जोहर आहे, काहींनी कलंक जोहर" , अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसारखा हुबेहुब दिसणारा टिकटॉकर सचिन तिवारी मुख्य भूमिका साकारत आहे. शमिक हा मूळ चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म व्हीएसजी बिंजवर हा चित्रपट स्ट्रिम केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. तसंच हे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाचे निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ‘मी हा चित्रपट यासाठी करत आहे जेणे करुन मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे मोठे स्टार्स आणि प्रॉडक्शन हाऊसची एकाधिकारशाही आहे ती संपवली पाहिजे. याच हेतूनं मी हा चित्रपट बनवत आहे’ असं त्यांनी म्हटलं होतं.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा