
या बदलामुळे कॅडबरी जंक्शन ते वर्तकनगर चौकादरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी वळणांचा वापर करावा लागणार आहे.
कॅडबरी जंक्शन आणि समर्थानगरकडून वर्तकनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वर्तकनगरजवळून वळावे लागेल. तर रेमंडच्या दिशेने वर्तकनगरकडे जाणाऱ्या वाहनांना सिंघानिया स्कूलजवळील टर्निंग पॉइंटचा वापर करावा लागणार आहे.
दरम्यान, वर्तकनगर नाका ते कॅडबरी जंक्शनदरम्यान सुमारे 700 मीटरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना पार्किंगलाही बंदी घालण्यात आली आहे.
या 30 दिवसांच्या प्रायोगिक कालावधीत वाहतूक पोलिसांकडून या बदलांचा परिणाम तपासला जाणार आहे. विशेषतः पीक अवर्समध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी होते का, याचे निरीक्षण केले जाणार असून त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा
