Advertisement

पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतुकीत बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करा

पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतुकीत बदल
SHARES

नवी मुंबईतील पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्ट रोजी वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. या मार्गावर दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने ठराविक वेळेत एका दिशेचा मार्ग बंद करून वाहतूक एकाच कॅरेजवेवरून दोन्ही दिशेने वळवण्यात येणार आहे.


15 ऑगस्टला ‘वंदे मातरम्’ कार्यक्रम

15 ऑगस्ट रोजी वंदे मातरम् प्रतिष्ठान, सानपाडा यांच्या वतीने 8 किलोमीटर लांबीची मानवी साखळी आणि सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन आयोजित करण्यात आले आहे.

त्यामुळे रात्री 1 वाजल्यापासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत बेलापूरकडून वाशी/मुंबई/ठाण्याकडे जाणारा मार्ग मोराज सर्कलपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.

सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत मुख्य कार्यक्रम होणार असून मानवी साखळी किल्ला जंक्शन, नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरून मोराज जंक्शनपर्यंत असेल.

या काळात वाशी-बेलापूर दरम्यानची वाहतूक एकाच कॅरेजवेवरून दोन्ही दिशेने सुरू ठेवली जाणार आहे. वाहनचालकांना उरण फाटा आणि सायन-पनवेल महामार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येईल.

16 ऑगस्टला City Health Run

16 ऑगस्ट रोजी City Health Run–2026 मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पहाटे 1 ते सकाळी 10 वाजेपर्यंत बेलापूरकडून वाशी/मुंबई/ठाण्याकडे जाणारा मार्ग मोराज सर्कलच्या पुढे बंद राहणार आहे.

या काळात वाहतूक विरुद्ध दिशेच्या कॅरेजवेवरून वळवली जाईल. तसेच किल्ला जंक्शन, बेलापूर ते NRI जेट्टीकडे जाणारा DPS Schoolच्या बाजूचा रस्ताही बंद ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी वाहनचालकांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना हे निर्बंध लागू असणार नाहीत.

दोन्ही दिवसांचे निर्बंध तात्पुरते असून, वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि विशेषतः पहाटेच्या वेळेत प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा

दादर, सांताक्रुझ आणि मुलुंडमध्ये अतिक्रमणांवर कारवाई

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा