Advertisement

मराठीतील पहिला झोंबिवर आधारीत चित्रपट, झोंबिवलीचा फर्स्ट लूक आला समोर

‘झोंबिवली’असं या चित्रपटाचं नाव असून पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील पहिला झोंबिवर आधारीत चित्रपट, झोंबिवलीचा फर्स्ट लूक आला समोर
SHARES

प्रेक्षकांचं आगळ्या-वेगळ्या पध्दतीनं मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम  चित्रपट लवकरच येत आहे. ‘झोंबिवली’असं या चित्रपटाचं नाव असून पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

आदित्य यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर इथं होणार आहे. या चित्रपटाचे पहिले-वहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत, कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन

आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित चित्रपट पाहिले आहेत. पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित चित्रपट बनतोय. या चित्रपटाचं शिर्षक इंटरेस्टिंग आहे आणि डोंबिवलीमधील झोंबिज असं कनेक्शन असल्यामुळे चित्रपटाचं नाव 'झोंबिवली' असं आहे.

युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते 'झोंबिवली' हा चित्रपट तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.

awrence D’Cunha हे सिनेमाचे डिओपी आहेत तर साईनाथ गणुवाड, सिध्देश पुरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी हे लेखक आहेत. एव्ही प्रफुल्ल चंद्रा यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे.

सिनेमाचा नविन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार हे नक्की. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे याचे उत्तर पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये प्रेक्षकांना मिळेल.हेही वाचा

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या

सुशांतवर आधारीत चित्रपटातील विलनचा लूक समोर, नेटिझन्सनी केली करणशी तुलना

संबंधित विषय
Advertisement